मुंबई

आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय, 'इथे' भाजी मार्केट १४ एप्रिलपर्यंत राहणार बंद...

सकाळवृत्तसेवा

भिवंडी : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन आदेशानुसार संचारबंदी करूनही भिवंडी शहरात सर्व रस्त्यांवर गर्दी होत आहे. शहरातील शिवाजीनगर तीनबत्ती भाजी मार्केट येथे दररोज हजारो नागरिक भाजी खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाने तीनबत्ती येथील घाऊक व किरकोळ भाजी विक्री येत्या 14 एप्रिलपर्यंत बंद करीत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून भाजीपाला मार्केट बंद करण्यात आले.

दरम्यान, भाजीपाला मार्केटमध्ये काही भाजी विक्रेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे निजामपूर पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

भिवंडीतीलतील शिवाजीनगर तीनबत्ती भाजी मार्केटमध्ये सकाळी घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसोबत नागरिक तोंडावर मास्क न लावता गर्दी करीत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यासाठी महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने अखेर भाजी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील घाऊक भाजी विक्रेत्यांनी पोगाव येथील नियोजित जागेवर खरेदी व्यवहार करून तो किरकोळ विक्रेत्यांना विक्री केल्यावर संबंधित किरकोळ विक्रेत्यास त्यांच्या प्रभागात जाण्यासाठी फक्त भाजीविक्रेते म्हणून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यांनी विक्री परिसरात सामाजिक अंतर बाळगत आपला व्यवसाय करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

bhiwandi municipal corporation decides to keep shivajinagar market close till 14th march

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

शुभमन गिल Asia Cup साठी संघात नकोय! सूर्यकुमारने केलेला विरोध? पण गंभीर-आगरकर यांनी...

Kolhapur Crime News : वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे, पण पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT