मुंबई

मोठी बातमी : 'हे' ठरणार राज्यातील पाहिले कोरोना लसीकरण केंद्र

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 19 : कोरोना लस देण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून लस देण्यासाठी पालिकेच्या डॉ आर एन कूपर रुग्णालयात उभारण्यात येत आहे. येत्या आठवड्याभरात हे केंद्र तयार करण्यात येणार असून हे राज्यातील पाहिले कोरोना लस केंद्र ठरणार असल्याचे सांगण्यात येतेय. जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात होणार असल्याचे अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबईत हे केंद्र बनवण्यात येत आहे. कूपरमधील एका रिकाम्या हॉलचा वापर करण्यात आला आहे. या केंद्रात वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले आहेत. पहिल्या कक्षात लसीकरणासाठी आलेल्यांकरिता प्रतीक्षालय असेल. दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लसीकरण केलं जाईल. तर तिसऱ्या कक्षात लस दिलेल्या व्यक्तींना काही काळ वैद्यकीय देखरेखीसाठी ठेवलं जाईल. हे केंद्र पुढील आठवड्याभरात तयार होत असून लसीकरणाची चाचणी घेतली जाईल अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ पिनाकीन गुजर यांनी दिली.

लसीकरणासाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. एफ दक्षिण विभाग कार्यालयात कोरोना प्रतिबंध लसीकरणासाठी 500 पथकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. तर कूपर येथील लसीकरण केंद्रात होणाऱ्या लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या पथकांचं प्रशिक्षण कुपर रुग्णालयातच गुरुवारपासून सुरू असल्याचेही गुजर यांनी सांगितले.

लसीकरण केंद्र कसे असावे यांच्या बाबतच्या आयसीएमआरच्या गाईडलाईन नुसार हे केंद्र उभारण्यात येत आहोत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेच्या कूपरसह बी वाय एल नायर, लो. टिळक आणि केईएम रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. कोरोना लस केंद्राचा पायलट प्रोजेक्ट म्हणून कूपरमधील हे केंद्र उभारण्यात येत असून बाकी केंद्रही या प्रमाणे बनवण्यात येणार आहेत. 

लसीकरणानंतर पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना केंद्रातच ठेवण्याची शक्यता आहे. लसीकरणामुळे काही अडचणी येत आहेत का, काही त्रास होतोय का याचे निरीक्षण केले जाईल. त्यानुसार सुधारणा करण्यात येतील. यानंतर अन्य तीन रुग्णालयांमध्येही याच धर्तीवर केंद्राची उभारणी करण्यात येईल. एका वेळी 100 व्यक्तींना लस देण्याची तयारी करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण केलेले युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) आणि पालिकेचे अधिकारी सध्या प्रशिक्षण देत आहेत. लस देण्यासाठी कार्यरत 500 पथकांचे प्रशिक्षण गुरुवारपासून सुरू झाले आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी केलेल्या ऍपचा वापर कसा करावा? यातून लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख कशी पटवावी? या माहितीची नोंद कशी करावी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जानेवारी पर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

big news regarding covid vaccination first vaccine center of maharashtra will be mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

SCROLL FOR NEXT