मुंबई

येत्या मंगळवारी होणार शेतकरी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा ?

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 28 तारखेला दादरच्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांकडून शेतकरी कर्जमाफीबद्दलचं वास्तव काय आहे याची माहिती मागवली. यानंतर पुढील काही बैठकांमध्ये सातत्याने शेतकरी कर्जमाफी कशा प्रकारे दिली जाऊ शकते याबद्दल बैठका झाल्याची माहिती समोर आली. 

याच पार्शभूमीवर राज्यातलं ठाकरे सरकार येत्या मंगळवारी म्हणजेच (3  डिसेंबर) ला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. आजची बहुमत चाचणी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ बैठक घेतली. यानंतर माध्यमांना उद्या ( ता 01, डिसेंबर ) रोजी सविस्तर माहिती देईन असं वक्तव्य केलंय.   

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून सुमारे 10 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं जाऊ शकतं. सकाळ माध्यम समूहाच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रयत्नशील असून त्याबाबतचा अहवालही त्यांनी मागवला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन दिलंय. अशात आता येत्या मंगळवारी  म्हणजेच (3  डिसेंबर) रोजी  किंवा त्याआधी खरंच शेतकऱ्यांसाठीची गोड बातमी येतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   

WebTitle : biggest decision of farmers loan wavier might be taken on third of december

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: 33 देशांमध्ये गद्दारांची ओळख... बनियन अन् चड्डी... संजय शिरसाटांच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची खोचक टिका

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास

Eye Donation: कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प; हिवरा आश्रमात १८० विद्यार्थ्यांकडून नेत्रदानाचा संकल्प!

SCROLL FOR NEXT