Chitra Wagh and Uddhav Thackeray Esakal
मुंबई

जनताच मतपेटीतून नशा उतरवते; चित्रा वाघांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राणा दाम्पत्याला नुकताच अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राजद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेलेल्या राणा दाम्पत्याला नुकताच अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यातील MRI करतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि मनिषा कायंदे यांनी थेट रूग्णालयात जात लिलावतीच्या प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. (Chitra Wagh Tweet On Shivsena)

चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणल्या की, नवनीत राणा यांनी जामीन मिळाल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilawati Hospital) उपचार घेतल्यावर तेथे MRI करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून शिवसेनेने लिलावतीत जाऊन दादागिरी केली.सत्ता डोक्यात जाते तेव्हा जनताच एक दिवस ती नशा मतपेटीतून उतरवते असे म्हणत वाघ यांनी तो दिवस फार लांब नाही, असे सूचक विधान केले आहे. (Navneet Rana MRI Photo)

नेमकं प्रकरण काय?

नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा MRI काढण्यात आला. यावेळी MRI काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरूनच पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांचा MRI नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. MRI रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी रूग्णालय प्रशासनाकडे केली.

राणांना रुग्णालयात शूटिंगची परवानगी कशी देण्यात आली, असा सवालही शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला केला आहे. त्याचबरोबर स्पाँडिलायसिस असताना नवनीत राणांनी उशी कशी काय वापरली, असा प्रश्नही पेडणेकरांनी उपस्थित केला. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसंच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन शिवसेनेला दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

Maha Shivratri 2026: भोलेनाथाच्या दरबारात समान हक्क! महाशिवरात्री 2026 ला त्र्यंबकेश्वरमध्ये VIP दर्शन बंद, जाणून घ्या काय झाले बदल

IND vs PAK : पाकड्यांनी लायकी दाखवली! इंग्लिश फॅन्सला धक्काबुक्की, धमकी अन्... पाकिस्तानी मार खाणारच होता, पण... Video

Vagdari ZP Election : बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव! बंडखोरी, अंतर्गत मतभेदांचा फटका; धनुष्यबाणाने केली कमळावर मात

SCROLL FOR NEXT