bjp leader devendra fadnavis pankaja munde obeisances Shiv sena supremo balasaheb thakrey 
मुंबई

देवेंद्र फडणवीसांसह 'या' भाजप नेत्यांनी केले बाळासाहेबांना अभिवादन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचे मतभेद झाल्यानंतर आज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने भाजप नेते शिवतीर्थावर येणार का?, असा प्रश्न सकाळपासून उपस्थित केला जात होता. त्याला भाजप नेत्यांनीच पूर्णविराम दिलाय. 

मुंडे, तावडेंनी केले अभिवादन
सकाळपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर, दुपारी एकच्या सुमारास भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, तसेच माजी मंत्री विनोद तावडे एकत्र शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादनही केले. पाठोपाठ आमदार भाई गिरकर आणि सुनील राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

अरे आवाज कुणाचा?
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे तेथेच काही काळ थांबले. या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील तेथे दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. दुपारी दीडच्या सुमारास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर दाखल झाले. या वेळी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. फडणवीस शिवतीर्थावर आले. त्या वेळी नार्वेकर वगळता एकही शिवसेना नेता उपस्थित नव्हता. फडणवीस आदरांजली वाहत असताना उपस्थितांमधून अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. 

दरम्यान, सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, माजी मंत्री आणि लोकसभा सदस्य अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT