मुंबई

'मुंबई' महापालिकेसाठी भाजपची तयारी सुरु तर 'ठाणे' जिंकण्याची जबाबदारी 'या' बड्या नेत्यावर

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : शिवसेनेशी सरकारसाठी युती करु असे विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले असले तरी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सूचनेनुसार स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेला थोपवण्याच्या गेल्या वेळच्या कमालीच्या यशस्वी प्रयोगाचे शिल्पकार आशीष शेलार यांना सेनेचा गड असलेल्या ठाण्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते दर आठवडयात सेनेच्या या गडात संघटनात्मक बांधणीसाठी जाणार आहेत.

मुंबईत भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मदत करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. या चमुत मुंबईचे माजी अध्यक्ष आशीष शेलार,संघटनमंत्री सुनील कर्जतकर, माजी राज्यमंत्री योगेश सागर यांचा समावेश आहे. मुंबईतील वस्तीवस्तीचे अवलोकन, तेथील बांधणी हे काम या समितीतर्फे केले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील तसेच महाराष्ट्राचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक या समितीत काम करणार आहेत. 

खालील महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

( संपादन - सुमित बागुल )

BJP starts their preparations for mumbai and thane municipal corporation elections

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT