covid war room 
मुंबई

मुंबईत रुग्णालयांमध्ये खाटांची लपवाछपवी थांबवण्यासाठी पालिकेनं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; वाचा महत्वाची बातमी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या रुग्‍णांना खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटांचे वितरण आता पालिकेच्‍या विभागस्तरावरील ‘वॉर रुम’मधून करण्याचा निर्णय आज पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आज घेतला. 

मोठ्या खासगी रुग्‍णालयातील 80 टक्‍के खाटा आणि अतिदक्षता विभागातील खाटांचे वितरण हे महापालिक‍ेच्‍या २४  विभागस्‍तरीय ‘वॉररुम’द्वारे केले जात आहे. त्याबाबत महापालिका आयुक्‍त चहल यांनी आदेश दिले आहेत. मुंबईतील मोठ्या खासगी रुग्‍णालयांचे प्रतिनिधींची तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बैठकला उपस्थित होते. 

कोरोना रुग्‍णांना वेळेत आणि प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता खाटांचे वितरण हे केवळ महापालिकेच्‍या 24 विभागस्‍तरीय ‘वॉर रुम’ द्वारे करण्‍यात येईल,  महापालिकेची रुग्‍णालये, शासकीय रुग्‍णालये व मोठी खासगी रुग्‍णालये यांचा त्यात समावेश आहे. या खाटांचे वितरण करण्‍याचा अधिकार खासगी रुग्‍णालयांना नाही. या पद्धतीने खाटा वितरण करण्‍याची पद्धत लागू केल्‍याचे सकारात्‍मक परिणाम आता दिसू लागले असून रुग्‍णांना अधिक लवकर वैद्यकीय उपचार मिळण्यास यामुळे मदत झाली आहे.

खासगी रुग्‍णालयातील रिसेप्‍शनिस्‍ट, टेलिफोन ऑपरेटर यांना बेड व्‍यवस्‍थापनाबाबत अवगत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्‍ध झालेल्‍या माहितीनुसार काही प्रकरणी कोविड बाधित रुग्‍णांनी किंवा त्यांच्या आप्तांनी थेटपणे खासगी रुग्‍णालयांना दूरध्‍वनी करुन दाखल होण्‍याबाबत विचारणा केली असता रुग्‍णालयातील रिसेप्‍शनिस्‍ट किंवा टेलिफोन ऑपरेटर यांच्‍याद्वारे रुग्‍णालयात खाटा उपलब्‍ध नसल्‍याचे सांगण्‍यात आले. 

त्यामुळे सर्व मोठ्या खासगी रुग्‍णालयातील रिसेप्‍शनिस्‍ट व टेलिफोन ऑपरेटर यांच्‍याद्वारे रुग्‍णांना चुकीची माहिती जावू नये व खाटांचे वितरण हे महापालिकेच्‍या विभागस्‍तरीय 'वॉर-रुम' द्वारेच केले जात असल्‍याची माहिती रुग्‍णांना दिली जाणे गरजेचे असल्‍याचे निर्देश  आयुक्‍तांनी दिले आहेत.
bmc has taken a decision for beds in private hospital 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Type-C Port Uses : मोबाईलचा Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही; 'हे' आहेत 10 भन्नाट उपयोग, 99 टक्के लोकांना आजही नाही माहिती

Year End Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला मोठं फळ देणारा योग! कल्याणासाठी ‘या’ वस्तू दान करायला विसरू नका

Dinesh Karthik : ...मग भारताविरुद्ध गळा का काढता? दिनेश कार्तिक आणि इंग्लंडच्या पीटरसनचा सवाल

Dr. Neelam Gorhe : शिवसेना २५ जागांवर ठाम; वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार

SCROLL FOR NEXT