navi mumbai 
मुंबई

म्हणून नवी मुंबई पालिकेला मुंबईमुळे धास्ती...

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबईत शहरात कामाला जाणाऱ्या अत्यवश्यक सेवेतील नागरिकांमुळे नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव झाला असल्याचे मत नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातून मुंबई शहरात कामाला जाणाऱ्या नर्स, डॉक्टर, पोलिस, बँक अधिकारी, महापालिका कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महापालिकेने करावी, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी केली आहे. जयवंत सुतार यांनी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मार्चपासून ते एप्रिलपर्यंत शहरात 145 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबईत विविध ठिकाणी नोकरीला जात आहेत. नवी मुंबईतून मुंबईत कामाला जाणारे डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, वॉर्डबॉय, बँक अधिकारी अशा स्वरूपातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यापासून नवी मुंबई शहरातील तब्बल 55 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच मुंबईत आयटी उद्योगात काम करणारे 15 रुग्ण, मुंबईत विविध वाहनचालकांमधून झालेले 11 रुग्ण नवी मुंबईत सापडले आहेत. मुंबईत ये-जा करीत असल्यामुळे काही नागरिकांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्यामार्फत नवी मुंबई शहरात कोरोनावाहकांची साखळी निर्माण झाली आहे.

कोरोनावाहकांच्या साखळीमुळे एकाच घरातील 14 ते 15 रुग्ण सापडले आहेत. नवी मुंबई हे मुंबईच्या शेजारचे शहर असल्यामुळे या शहरातून अत्यवश्यक सेवेसाठी कामाला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच हे सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील असल्यामुळे त्यांचे कामावर जाणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र हे नागरिक मुंबईतून नवी मुंबईत ये-जा करीत असल्याने नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची बृहन्मुंबई महापालिकेने राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी सूतार यांनी केली आहे. 

शहरात सापडणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश कोरोना वाहकांची साखळी मुंबईतून आलेल्या नागरिकांमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधितांची संख्या थांबवण्यासाठी ही मागणी करण्यात येत आहे.
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

SCROLL FOR NEXT