Sushant Singh Rajput  
मुंबई

Breaking: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एकाला अटक

Bollywood Actor Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांतचा १४ जून २०२० ला संशयास्पद मृत्यू

अनिश पाटील

अभिनेता सुशांतचा १४ जून २०२० ला संशयास्पद मृत्यू

मुंबई: सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात NCB चे अटकसत्र अद्यापही सुरूच असून या प्रकरणी ड्रग्ज (Crugs) अँगल येताच वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे. अशातच या प्रकरणात आणखी एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. गोव्यातून (Goa) हेमल शहा (Hemal Shah) या ड्रग्ज तस्कराला सुशांत प्रकरणात अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. NCBच्या एक पथकाने शहाला अटक केली आणि मुंबईत आणलं. (Bollywood Actor Sushant Singh Rajput Death Case One More Arrest by Narcotics Control Bureau)

यापूर्वी, NCB ने सुशांत प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग तस्करांना अटक केली आहे. हेमल शाहच्या अटकेनंतर सुशांत सिंहच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणात अनेक नवीन खुलासे होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स संबधित चित्रपट क्षेत्रातील अनेक व्यक्तिंची नावे समोर आली. यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर कारवाई करत अनेक काही ड्रग्ज पेडलर्सना अटक केली. ड्रग्स आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध शोधत NCB ने अनेक नामांकित सेलिब्रिटींचीही चौकशी केली. गेल्या वर्षी जूनमध्ये सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले होते. ड्रग ओव्हरडोज हे मृत्यूचे कारण असल्याचे काहींकडून सांगण्यात आले. तेव्हापासून NCB बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंध शोधण्यात गुंतली होती. या प्रकरणात NCB ने न्यायालयात आपले दोषारोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात NCB ने सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह 33 जणांवर आरोप केले आहेत.

सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील घरात सापडला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील के के सिंह यांनी पटनामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरूद्ध FIR दाखल केला होता. त्यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. यानंतर, ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा खटला CBI कडे सोपवण्यात आला. CBI च्या चौकशीत जेव्हा ड्रग्सचे कनेक्शन समोर आले, तेव्हा या प्रकरणात NCB चादेखील तपास सुरु झाला.

दरम्यान, या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली. ती तब्बल एक महिना भायखळा तुरूंगात होती. मात्र, नंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन मिळाला. सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर NCB ने बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांची आतापर्यंत चौकशी केली आहे. यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan), रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) अशा अनेक अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT