exam result 
मुंबई

आज सीबीएसई दहावीचा निकाल; मनुष्यबळ विकासमंत्र्यांची माहिती

तेजस वाघमारे

मुंबई : सीबीएसई मंडळाचा दहावीचा ऑनलाईन निकाल 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून निकालाच्या तारखेविषयी घोषणा केली आहे. निशंक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक अशा शुभेच्छादेखील दिल्या आहेत. सीबीएसईच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार असून अॅपच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल समजू शकणार अाहे. विद्यार्थांना cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

दरम्यान, नुकताच दोन दिवसांपूर्वी सीबीएसई मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. बारावीचा यंदा निकाल 88.78 टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत निकालात 5.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 92.15 टक्के मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.19 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल 66.67 टक्के इतका लागला आहे. 

बारावीच्या निकालात 1 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना यंदा 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 57 हजार 934 तर 95 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 38 हजार 686 इतकी आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

SCROLL FOR NEXT