mumbai rain 
मुंबई

मुंबईकरांनो सावधान! पुढचे ३ दिवस अनावश्यक घराबाहेर पडू नका; 'हे' आहे कारण..   

समीर सुर्वे

मुंबई: मुंबई परिसरात आज दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबईसह, ठाणे , पालघरमधील काही भागात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर, रायगड जिल्ह्यात मंगळवारी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत आज पुन्हा पावसाची रिपरीस सुरु होती. विशेषतः उपनगरात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. संध्याकाळी 5.30 वाजे पर्यंत संपलेल्या 24 तासात कुलाबा येथे 14 मिमी आणि सांताक्रुझ येथे 52 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. 

काही दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे उकाडा जाणवत होता.रविवारी पावसााााला सुरवात झाल्याने कमाल तापमानात 4 अंशाची घट नोंदविण्यात आली आहे. शनिवारी कुलाबा येथे 32.4 आणि सांताक्रुझ येथे 32.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते.

तर रविवार संध्याकाळी कुलाबा येथे 29.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 25 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. तर सांताक्रुझ येथे कमाल 28.6 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पुढील  दोन दिवस याच पातळीवर तापमान राहण्याचा अंदाज आहे.

संपादन :  अथर्व महांकाळ 

chances of heavy rain in mumbai next 3 days 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

Best FD Return: FD वर मिळतोय 8% पेक्षा जास्त व्याज! कोणती बँक देते सर्वाधिक रिटर्न? गुंतवणुकीआधी एकदा जाणून घ्या

मित्राच्या कारमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं अन्...; अमरावतीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

Marathi Live News update: छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो लिटर इंधन उपलब्ध असल्याची प्रशासनाची माहिती

Mumbai Crime: जागेच्या वादातून प्रवाशाला मारहाण, दहा लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास; २५ दिवसांनी तक्रार

SCROLL FOR NEXT