मुंबई

येत्या काळात स्वतःच्या बिझनेससाठी पैसे उभे करायचेत? प्रश्न पडलाय काय करावं? वाचा बातमी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अनेक देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सर्वांना घरीच बसून राहावं लागतंय. बहुतांश लोकांना आता घरी बसून कंटाळा यायला लागलाय तर काही वर्क फ्रॉम होम करतायेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात चिंतेचंही वातावरण आहे.

मात्र लॉकडाऊनमुळे काही पॉझिटिव्ह गोष्टीही घडत आहेत. कधी नव्हे ते लोकांना इतक्या दिवसांची सुट्टी मिळाली आहे. त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. या काळात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. ज्यामुळे तुम्ही अजून सक्षम होऊ शकाल. त्यामुळे या लॉकडाउनच्या काळात तुम्हाला आवडतील असे आणि तुमच्या खिशाला परवडतील असे काही ऑनलाईन कोर्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारताची सध्याची ऑनलाईन शिक्षणासंदर्भात अग्रगण्य असलेली कंपनी 'अपग्रॅड'नं ऑनलाईन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. अपग्रॅडच्या माध्यमातून तुम्हाला आता जगातल्या अग्रगण्य युनिव्हर्सिटीजमधून ऑनलाईन MBA आणि MASTERS करण्याची संधी मिळणार आहे. ऑनलाईन MBA चं शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या लोकांना आता फक्त १० हजार रुपये भरून हा कोर्स सुरु करता येणार आहे.  

Deakin University मधून MBA (Global):

या कोर्सच्या माध्यमातून एमबीए करू इच्छिणाऱ्या लोकांना Deakin school of business मधून एमबीएची डिग्री प्राप्त करता येणार आहे. हा कोर्स  २ वर्षांचा असणार आहे. यामध्ये अपग्रॅडकडून विद्यार्थ्यांना ३६० डिग्री करिअर सपोर्ट मिळणार आहे.  
हा कोर्स विद्यार्थ्यांना संपूर्ण  जगाची ओळख घडवून देणार आहे.

Liverpool Business School मधून  Global MBA:

या कोर्समध्ये दोन गोष्टी असणार आहेत. एक म्हणजे Liverpool Business School मधून Global MBA. दुसरं म्हणजे ITM गाझियाबाद मधून  PGP in Mangement.
हा कोर्स २० महिन्यांचा असणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना लिव्हरपूल विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून मन मिळणार आहे. यात विद्यार्थ्यांना १ आठवडा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये राहून शिकण्याची  संधी मिळणार आहे.

Liverpool John Moores University मधून Masters of Data Science:

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना M.Sc in data science करता येणार आहे. हा कोर्स १८ महिन्यांचा असणार आहे. यामध्ये नोकरी करणार्यांना देखील प्रवेश घेता येणार आहे. 
भारतात राहून, नोकरी करून तुम्हाला सहज हा कोर्स करता येणार आहे.  

ITM चा PG Program in management:

हा कोर्स ११ महिन्यांचा असणार आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिकवलं जाणार आहे. यात मॉक इंटरव्हू घेतले जाणार आहेत. ऑफलाईन बेसकॅंप्स घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ITM चे विद्यार्थी म्हणून मान मिळणारे आहे. 

IIT बंगळुरू PG Diploma in Data science:

नोकरी करणाऱ्या लोकांना सध्याचे बदलते ट्रेंड्स समजावे म्हणून हा कोर्स डिझाईन करण्यात आलाय. हा कोर्स १२ महिन्यांचा असणार आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना IIT बंगळुरू विद्यार्थी म्हणून मान मिळणार आहे 

APG लर्निंग मधील ENTREPRENEURSHIP DEVELOPMENT PROGRAM 

या कोर्सच्या माध्यमातून तुमच्यातील उद्योजक म्हणून असणाऱ्या कलागुणांना कशी दिशा द्यावी याबद्दल माहिती दिली जाते. अगदी माफक फीमध्ये तुम्हाला विविध ११  मोड्युलमधून माहिती दिली जाते. आपल्या उद्योगासाठी पैसे कसे उभे करायचे, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल या कोर्सच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त माहिती दिली गेलीये. ऑनलाईन कोर्स असल्याने तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कोर्स पूर्ण करता येतो. कोर्सची माहिती घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...     

check these online courses offered by various cream universities

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT