Chhagan Bhujbal 
मुंबई

Chhagan Bhujbal: आपल्या गडगंज संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर संपत्तीवरुन भाजपकडून वारंवार टीका केली जाते. पण त्यांच्या या टीकेला खुद्द भुजबळांनीच उत्तर दिलं असून आपल्याकडं इतकी संपत्ती कशी आली याची माहिती त्यांनी दिली. भुजबळांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, उद्धव ठाकरे तसेच जावेद अख्तर यांसारखे दिग्गज उपस्थित होते. (Chhagan Bhujbal himself gave info about his big property)

यावेळी आपल्या आयुष्याचा पट उलगडताना छगन भुजबळ काहीसे भावूक झाले. पण लहानपणापासून आपण किती कष्ट केले याचा उलगडा त्यांनी यावेळी उपस्थितांसमोर दिला. भुजबळ म्हणाले, आम्ही लहान असताना आम्ही मार्केटला भाजी आणायला जायचो. तिथून भाजी आणायची आणि नंतर माझगावला फुटपाथवर ती विकायचो. पुढे माझा मोठा भाऊ म्हणजे समीर भुजबळांचे वडील त्यांनं खूप कष्ट घेतले. सकाळी तीन वाजता भाऊ भाजी मार्केटला जायचा त्यानंतर पाच वाजता मी जायचो. त्यानंतर हळूहळू आमचा धंदा वाढत गेला, मी शिक्षणही करायचो. आरसीएफ, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांची आम्ही वार्षिक कॉन्ट्रॅक्ट मिळवली. त्यावेळी मलन बंधू नावानं आम्ही ही कॉन्ट्रॅक्ट घेतली त्यानंतर आम्ही दररोज ट्रकलोड भाजी पाठवायचो. पण लोक मला विचारतात की एवढी संपत्ती कुठून आणली? ही संपत्ती कमावण्यासाठी आम्ही लहान पणापासून मेहनत घेतलीए.

त्या काळात दास एम अँड कंपनीचे प्राणलाल खोगीलाल यांच्याकडे भारतातील सर्वात जास्त विंटेज कार होत्या, तीथे मी मॅनेजर होतो. आण्णासाहेब पाटील माझे मित्र त्यांसोबत माथाडी कामगारांचे मी कॉन्ट्रॅक्टही घेतले. अजिवारीमध्ये एक रब्रेक्स नावाची कंपनी बंद पडली होती. या कंपनीचा मालकच सोडून गेला होता. त्यामुळं कामगारांना पगार नाही काही नाही. त्यावेळी कामगार मला म्हणाले, घ्या कंपनी चालवायला आणि आमचा पगार द्या हळूहळू. ही कंपनी मी सुरु केली त्यामध्ये संपूर्ण बीएसटीच्या बस गाड्यांच्या टायर रिमोल्डिंगचं काम माझ्याकडं यायचं. त्यानंतर दुसरी कंपनी पनवेलमध्ये घेतली. रबराचे विविध पार्ट्स बनवणारी ही कंपनी होती. मुंबई आणि गोव्यातील पहिली लक्झरी बस भवानी ट्रॅव्हल्स ही छगन भुजबळने सुरु केली. सिनेमाही काढले, असे अनेक उद्योग सुरु होते, तरीही लोक विचारतात कसे आले पैसे कसे आले पैसे? अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या संपत्तीबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT