mumbai 
मुंबई

मुंबईतील विकासकामे ‘मेड इन चायना’! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी चीनच्या कंपनीचे सहकार्य घेतले जाणार आहे. मुंबईतील समुद्र आणि टेकडीखालील वाहतुकीचा बोगदा, महालक्ष्मी येथील दोन नवे केबल पूलही चीनची कंपनी बांधणार आहे. या विकासकामाबाबत प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

समाजमाध्यमांवर चिनी मालावर बहिष्कार टाकण्यासाठी अनेकदा आंदोलने केली जातात. ‘मेक इन इंडिया’ला पाठिंबा देण्याच्या मागण्याही केल्या जातात. मात्र, मुंबईतील दोन मोठ्या विकासकामांसाठी चिनी कंपनीचा हातभार लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लवकरच या पुलाचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूप्रमाणे महालक्ष्मी येथे महापालिका दोन केबल पूल बांधणार आहे. त्यासाठी ७४५ कोटी रुपयांचा खर्च करणार असून लखनऊ येथील ‘ॲपको इन्फ्राटेक’ आणि चीनची ‘चायना रेल्वे फर्स्ट ग्रुप’ या दोन कंपन्यांनी भागीदारी करून या कामाचे कंत्राट मिळवले आहे. या कंपन्यांना हे कंत्राट देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर झाला आहे. या भागीदारीतील कंपनीत भारतीय कंपनीची भागीदारी ६५ टक्के असल्याने चिनी कंपनीला काम करण्यास कोणताही तांत्रिक अडथळा नसल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला.

किनारी मार्गाचा नरिमन पाईंटपासून प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा गिरगाव चौपाटी आणि मलबार हिल खालून जाणारा भुयारी मार्ग खोदण्यासाठी चीनवरून यंत्र मागवण्यात येणार आहे. हे यंत्र एप्रिल महिन्यात मुंबईत दाखल होणार आहे. लार्सन ॲण्ड टुर्बो ही कंपनी हे काम करत असली तरी भुयारी काम चीनच्या टनेल बोअरिंग मशिनने खोदले जाणार आहे.

असा असेल पूल 
वरळी नाका येथून सुरू होणारा हा पूल डॉ. ई मोजेस मार्गावरून पश्‍चिम रेल्वेला ओलांडून महालक्ष्मीच्या धोबीघाट येथील सात रस्त्यापर्यंत जाणार आहे. हा पूल ६३९ मीटर लांबीचा असेल. तर दुसरा पूल ८०३ मीटर लांब असून सात रस्ता येथील न्यू शिरीन थिएटरपासून महालक्ष्मी रेसकोर्स येथील केशवराव खाडे मार्गापर्यंत बांधण्यात येणार आहे.

चार मजली मशीन 
किनारी मार्गाचा भुयार तयार करण्यासाठी १२ मीटर व्यासाची बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहे. ही देशातील सर्वात मोठी मशीन आहे. तर साधारण १६ ते १७ मीटर उंचीची ही साधारण चार मजली उंच इमारतीएवढी असणार आहे. एक भुयार खोदण्यासाठी किमान आठ महिन्यांच्या कालावधी लागेल. सध्या मेट्रो रेल्वेच्या खोदकामासाठी ७ मीटर व्यासाची मशीन वापरली जाते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT