political careers at risk Eknath Shinde feelings Nana Patekar maharashtra politics esa
मुंबई

Eknath Shinde: ग्रामपंचायत निवडणुकांवर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमची भूमिका...

राज्यात आज १०७९ ग्रामपंचायती आणि सरपंच निवडीचा निकाल जाहीर झाला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील १०७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज समोर आला. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीनं पाचशेहून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची भूमिका सर्वमान्य झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. (CM Eknath Shinde First Reaction on Gram Panchayat Elections)

मुख्यमंत्री म्हणाले, मतदारांचं मी मनापासून अभिनंद करतो त्यांना धन्यवाद देतो. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मतदान करुन बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला पाचशे पेक्षा जास्त सरपंचाच्या जागा मिळवून दिल्या आहेत. निवडणुकांमध्ये यश अपयश हे जनतेच्या हातात असतं. या ग्रामपंचायतीत मतदारांनी कौल दिला आहे. मागच्यावेळी देखील त्यांनी आमच्याबाजून कौल दिला होता. या ग्रामपंचायतीतही ते स्पष्ट झालेलं आहे.

बाळासाहेबांच्या विचारांची आमची भूमिका या निवडणुकीत सर्वमान्य झाली आहे. त्यामुळं जनतेनं आमच्या पारड्यात भरभरुन मतदान केलं आहे. लोकांनी आम्हाला विश्वासानं मतदान केलंय. आमच्या सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास होईल, त्यांचे प्रकल्प मागे लागतील यावरुन त्यांनी हे मतदान केलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

अंधेरीत यासाठी माघार घेतली

अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारानं देखील आवाहन केलं होतं. रमेश लटके आमचा सहकारी आमदार होता. या परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईक या सर्वांनीच उमेदवार मागं घेण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्राची प्रथाच आहे की, ज्या आमदाराचा मृत्यू होतो त्या जागी त्यांच्या घरातील कोणी उभं राहिलं तर ती निवडणूक बिनविरोध होते. तसं बघायला गेलं तर भाजप-शिवसेना युतीनं उमेदवार दिला होता. त्याची जोरदार तयारी केली होती, त्यांना जिंकण्याचा विश्वास होता. पण सर्वांच्या आवाहनाचा विचार करता आम्ही चर्चेतून युतीचा उमेदवारानं यातून माघार घेतली. मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आहे तेव्हा कळेलच कोण हारतंय कोण जिंकतंय? असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पत्नी आहे तरी कोण?

Panchang 25 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

Pune Crime:'तरुणीशी मैत्रीच्या संबंधातून कात्रजजवळ तरुणाचा खून'; प्रेमाच्या नात्यातून मैत्रीचा बेरंग, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT