मुंबई

मोबाईलवरून फोटो अपलोड करा आणि शेतीची नुकसान भरपाई मिळवा

सकाळ वृत्तसेवा

अवकाळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलंय. महाराष्ट्रातून पाऊस जाण्याचं काही नाव घेत नाहीये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करायला लागतंय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केलाय.

मोबाईलवरून फोटो अपलोड करण्याची मुभा सरकाने शेतकर्यांना दिली आहे. त्याचसोबत ज्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनीही काळजी करू नये. नुकसान झालेल्या सर्वांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. सरकारने केलेले पंचनामे खासगी विमा कंपन्या ग्राह्य धरणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय  

कुठे किती नुकसान : 

  • नाशिक जिल्ह्यात ५२ तालुक्यांमध्ये १६ लाख हेक्टरवर नुकसान झालंय. 
  • पुणे जिल्ह्यात ५१ तालुक्यांमध्ये १ लाख ३६ हजार हेक्टर नुकसान  
  • औरंगाबाद जिल्हा सर्वात जास्त बाधित झालाय. यातील ७२ तालुक्यांमध्ये २२ लाख हेक्टरवर नुकसान झालंय.  
  • अमरावती जिल्ह्यात ५६ तालुक्यांमध्ये १२ लाख हेक्टरवर नुकसान झालंय. 
  • नागपूरमध्ये ४८ तालुक्यांमध्ये ४० हजार हेक्टरवर नुकसान झालंय.  

कोणत्या पिकांचं किती हेक्टरवर नुकसान : 

  • सोयाबीन शेतीचं १८ ते १९ लाख हेक्टरवर नुकसान 
  • कापूस शेतीचं १९ लाख हेक्टरवर नुकसान  
  • मका शेतीचं ५ लाख हेक्टरवर नुकसान  
  • ज्वारी  शेतीचं २ लाख हजार हेक्टरवर नुकसान झालंय 
  • बाजरी शेतीचं २ लाख हजार हेक्टरवर नुकसान झालंय
  • भात शेतीचं १ लाख ४४ हजार हेक्टरवर नुकसान झालंय 
  • फळ पिकांचं ५३ हजार हेक्टरवर नुकसान झालंय 

दरम्यान नुकसानभरपाई साठी राज्य सरकारने केंद्राकडे देखील मदत मागितली आहे. पुढील आठवड्यात मदतकार्य गतिमान होईल. सर्व विभागीय जिल्हाधिकार्यांना आणि आयुक्तांना याबाबतचे आदेश देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय.    

WebTitle : cm fadanavis on un seasonal rain relief by government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT