ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त; पालिका आयुक्तांना दिल्या महत्त्वाच्या सूचना... 
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त; पालिका आयुक्तांना दिल्या महत्त्वाच्या सूचना...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करून घ्या. जेणे करून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी (ता.9) ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोख्ण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सांगितले. 

मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. सध्या मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत. तशा सुविधा महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते. वारंवार तशा सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येत्या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. या सुविधांमध्ये प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी उपलब्ध कराव्यात. आयसीयू, डायलेसिस सुविधांची उपलब्धता व्हावी. याशिवाय पालिकांनी आवश्‍यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 


तातडीने पाऊले उचलण्यासाठी बदल्यांचा निर्णय 
पुढील तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये? याविषयी सर्वाना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सुचना आणि निर्देश स्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल. असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले, कारण ते कार्यक्षम नव्हते. तर कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पाऊले उचलणे गरजेचे होते. असेही ते मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

दक्षता समित्या नेमा 
कोरोनाची ही लढाई केवळ सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा, स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का? तसेच त्यांची ऑक्‍सिजन पातळीबरोबर आहे का? परिसरात कुणाला काही आजार आहेत का? स्वच्छता नियमित केली जाते का? लोक मास्क घालतात का? या तसेच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्यांची प्रशासनाला मदत होईल. मुंबईत 2010 मध्ये मलेरिया, डेंग्यूच्या वेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याप्रमाणे मिशन मोडवर ही कामे सर्वांनी करावे. असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


पावसाळ्याच्या दृष्टीने नियोजन करावे : मेहता
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची साथ झपाट्याने पसरत असून, हा केवळ राज्यासाठी नव्हे तर देशासाठी सुद्धा चिंतेचा विषय बनला आहे. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, संस्थात्मक विलगीकरण वाढविणे, उद्योग व कंपन्यांच्या मदतीने त्यांच्या परिसरात चाचण्या करणे, उपचारांची सुविधा वाढविणे, नॉन कोव्हीड रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत, सर्व पालिकांमध्ये समान प्रमाणात बेड्‌सचे नियोजन असावे. ऑक्‍सिजन सुविधा असलेले बेड्‌स वाढवावे, पावसाळा असल्याने सर्दी, तापाचे, खोकल्याचे रुग्ण यांना उपचार मिळण्याकडे लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी यावेळी सांगितले.

--------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT