मुंबई

बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री मुंबईबाहेर! रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा करणार

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातल्या किनारपट्टीवर धडकले. याचा तडाखा जिल्ह्यातील 12 तालुक्यांना बसला. कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर या जिल्ह्यांमध्ये किती मोठं नुकसान झालं याबाबतची माहिती आता समोर येत आहे. याच जिल्ह्याची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणारेत. जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेणार असल्याची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. यावेळी वादळग्रस्त भागांतील लोकांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघतील. मांडवापर्यंत त्यांचा रोरो फेरी बोटीतून प्रवास असेल. त्यानंतर चक्रीवादळाने नुकसान झालेल्या गावांना रस्ते मार्गाने जाऊन भेट देतील. तिथे ते नुकसान पाहणी दौरा करतील. त्यानंतर ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

असा असेल मुख्यमंत्र्यांचा अलिबाग दौरा 

सकाळी 11 वाजता मुंबईहून रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडसाठी रवाना
दुपारी 12.30 वाजता मांडवा जेट्टी येथे मुख्यमंत्र्यांचं आगमन
दुपारी 12.35 वाजता मांडवा जेट्टी येथून अलिबागच्या दिशेनं रवाना
दुपारी 12.50 वाजता थळ (अलिबाग) येथे मुख्यमंत्री पोहोचतील. तिथे चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.
दुपारी 1.20 वाजता थळ येथून अलिबागच्या दिशेनं रवाना
दुपारी 1.35 वाजता अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथील नुकसानीची पाहणी करणार
दुपारी 1.40 वाजता गाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना
दुपारी 1.50 वाजता मुख्यमंत्री निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
दुपारी 2.50 वाजता - मांडवा जेट्टी येथून मुंबईच्या दिशेनं रवाना

या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेखही असतील. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे या देखील उपस्थित असणार आहे. याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे रायगड जिल्हा तसेच इतर नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT