मुंबई

सीएए, एनपीआरबाबत काँग्रेसकडून अपप्रचार : डावखरे 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ठाणे शहर जिल्हा भाजपच्यावतीने शहराच्या विविध भागांत भारतीय नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय लोकसंख्या पुस्तिका (एनपीआर) बाबत जनजागृती करण्यात आली. सीएए, एनपीआरमुळे भारतातील नागरिकांना काहीही त्रास होणार नाही. मात्र, कॉंग्रेससह विरोधी पक्षांकडून अपप्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात हा मुद्दा वापरला जात आहे, असा दावा यावेळी आमदार व भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला. कॉंग्रेसच्या काळात एनपीआरची सुरुवात करण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी सीएए व एनपीआरबाबत सविस्तर माहिती दिली. 

शहरात विविध ठिकाणी भारतमातेचे पूजन करण्यात आले. निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जनजागृतीच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील रेल्वे स्टेशन, नौपाडा, राम मारुती रोड, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, घोडबंदर रोड आदी भागांमध्ये उत्साहात भारतमातेचे पूजन करण्यात आले. तसेच सीएए व एनपीआरबाबत माहिती देण्यात आली.

नौपाड्यात झालेल्या कार्यक्रमाला आमदार डावखरेंबरोबच ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, राजेश मढवी आदी उपस्थित होते. आमदार संजय केळकर, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, संदीप लेले, मुकेश मोकाशी यांनीही भारत पूजनाच्या कार्यक्रमात भाग घेऊन ठिकठिकाणी सीएए, एनपीआरबाबत जनजागृती केली. ठाणे रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॅंण्डजवळ झालेल्या कार्यक्रमाला रिक्षाचालकांबरोबरच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT