मुंबई

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

सकाळ वृत्तसेवा

विनोद राऊत

Mumbai Crime News: उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधातील नाराजी अजूनही दूर झलेली नाही. मंगळवारी वर्षा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्यावेळीही नसीम खान गैरहजर होते.

दरम्यान, पक्षश्रेष्ठी त्यांच्या संपर्कात असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नसीम खान यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात येते.

निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले नसल्याच्या कारणावरुन नसीम खान हे प्रचारापासून अलिप्त आहेत. वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज भरताना ते गैरहजर होते. माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे प्रचाराला जाणार नाही, असे नसीम खान यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लीम समुदायाची संख्या साडेचार लाखाच्या घरात आहे. नसीम खान यांच्या नाराजीचा फटका थेट बसणार नसला तरी वेगळा संदेश जावू शकतो, अशी भीती असल्याने त्यांची नाराजी दूर होईल, अशी आशा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे.

अध्यक्षपदासाठी चाचपणी?

नसीम खान यांच्या नाराजीमुळे मुस्लिम समाजाचा प्रतिनिधीत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, ज्या प्रकारे भाजपकडून मुस्लिम तुष्टीकरण, आरक्षणाचे मुद्दे उपस्थित होत आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व सध्या शांत आहे. मुबईचे काँग्रेस अध्यक्ष पद नसीम खान यांच्याकडे सोपवण्याच्या पर्यायावर पक्षात अंतर्गत विचार सुरु आहे. वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मुंबईतील इतर भागांत प्रचारासाठी फारसे फिरता येत नाही. मुंबई अध्यक्षपद हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाते.

नाराजीची कारणे

- अल्पसंख्याक समाजाला तिकिट दिले नसल्यामुळे नाराज असल्याचे नसीम खान सांगत असले तरी त्यांची संताप वेगळाच आहे. सुरुवातीला निवडणूक लढवण्यात नसीम खान उस्तुक नव्हते. मात्र, ज्येष्ठ नेत्याने त्यांना लढवण्यास राजी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीकडून या मतदासंघासाठी एकमेव नसीम खान यांची शिफारस केल्याचे कळते.

-

पक्षाकडून तिकिटाचे पक्के आश्वासन मिळाल्यानंतर नसीम खान यांनी निवडणुकीची तयारीही सुरु केली होती. मात्र, ऐनवेळी दिल्लीत त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. त्यामागे मुंबईतील दोन अल्पसंख्याक आमदार असल्याचे सांगण्यात येते. या सर्व प्रकारामुळे सरळमार्गी समजल्या जाणाऱ्या नसीम खान यांना जास्त संताप अनावर झाल्याचे समजते

मी स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे. प्रचाराला जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पक्ष नेतृत्वाशी माझे बोलणे सुरु आहे.

- नसीम खान, काँग्रेस नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT