construction-labour 
मुंबई

मुंबईतील बांधकामे सुरु; मजुरांना मात्र गावाकडचीच ओढ

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील बांधकामे सुरु झाली असून बांधकाम मजूरांना पैसेही मिळत आहे. पण हातात पैसे असतानाही या मजूरांना गावी परतण्याचे वेध लागले आहेत. कामावर असतानाही त्यांना आपला गावी परतण्याचा अर्ज कधी मंजूर होणार याचेच वेध लागलेले आहेत. मुंबईतून परतण्याचे स्वप्न बघत असलेले काही बांधकाम मजूर तर काही महिन्यापूर्वी आले आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईत आलो, त्यावेळी या परिस्थितीत इथे फसू असे कधीही त्यांना वाटले नव्हते. त्यातील अनेकांना काम संपल्यावर आता घरी परतण्याची ओढ जास्तच लागते. आमच्या कंत्राटदाराने खायला दिले आहे, मात्र आता येथे मन लागतच नाही, असे ते सांगतात. 

एका महिन्याच्या कठोर लॉकडाऊननंतर सरकारने बांधकामास परवानगी दिली आहे. कामगार असलेल्या अनेक ठिकाणी खाजगी विकासकांनी परवाना घेऊन काम सुरु केले आहे. अर्थातच एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे. प्लॅस्टरींग, वॉटरप्रूफींग, स्ट्रक्चरल रिपेअरिंग सुरु आहे. मात्र कामगार थांबण्यास तयार नाहीत.

काम तर सुरु आहे, पण कामगार किती दिवस येतील, हा प्रश्न अनेक बांधकाम उद्योजकांना सलत आहे. गावी जाण्यात येणाऱ्या अडचणीही ते कामगारांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर नवी बांधकामे सुरु करण्यास परवानगी दिल्यास जास्त कामगारांना कामे सुरु करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र अनेक कामगार आमचे कामात लक्ष लागत नाही. 

काही कामगारांकडे गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी कागदपत्रे नाहीत, पण त्यातील अनेकांनी लॉकडाऊन संपल्यावर ट्रेन सुरु झाल्यावर आपण परतणार असल्याचे सांगितले. आम्ही ठरवले तरी गावाकडचे आमचे नातेवाईक परत येण्यासाठी आग्रही धरीत आहेत. एकाने माझी आई रोज किमान दहा वेळा फोन करते आणि काही वेळातच रडायला सुरुवात करते, असेही अनेकजण सांगतात. 

बांधकाम व्यावसायिक पुरेसे मजूर मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत. एका व्यावसायिकांनी आमच्याकडील मजूर ट्रकने गावाला परतत असल्याचे सांगितले. एकाने सध्या शंभरजण काम करीत आहेत, पण त्यातील पन्नास जणांनी अर्ज भरला आहे, असे सांगतात. आमच्याशी बोलतानाही त्यांचे लक्ष फोनकडे असते. प्रत्येक मेसेज ते बघत असतात, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT