मुंबई - कोरोना व्हायरसचं थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरु झाला. त्यातच महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आढळून आलेत. कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहिली असता मुंबई आणि पुण्यात जास्त प्रार्दुभाव झाल्याच दिसत आहे. राज्यातील काही जिल्हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेत. दरम्यान याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वेगळचं महत्त्वाचं आहे. मुंबई पुण्यासह मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशोत्सवादरम्यान मुंबई पुण्यात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळते. कोरोनामुळे यंदाच्या सणासुदीवर विरजन पडणार असल्याचं प्रशचिन्ह मनात उपस्थित झाले आहेत. सोशल डिस्टन्सिंगमुळे गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे की नाही याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
साधेपणानं साजरा करणार यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव
गणेशोत्सवापर्यंत राज्यात कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती सामान्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती देखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. मात्र दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणानं साजरा केला जाणार आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा असं सांगितलं आहे. गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न साजरा करता अत्यंत साधेपणाने करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी याबाबतची माहिती गणेश मंडळांनाही दिली आहे. काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला होता, असंही नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस तसंच पालिकेवरही मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणारेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र दहीबावकर यांनी दिली आहे.
coordination committee of ganeshotsav in mumbai took biggest decision
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.