कोरोनाच्या संकटामुळे गृह खरेदीवर मंदीची छाया 
मुंबई

कोरोनाच्या संकटामुळे गृह खरेदीवर मंदीची छाया

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गुढीपाडव्याला गृहखरेदीवर मंदीचे सावट राहण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सरकारने सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

ही बातमी वाचली? मुंबई, नवी मुंबईचे प्रदुषण एका दिवसात निम्म्याने घटले

नोटाबंदी, रेरा, जीएसटी, बॅंकिंग व बिगरबॅंक वित्तसंस्थांना बसलेले हादरे या कारणांमुळे काही वर्षांपासून बांधकाम व्यवसाय रडतखडत सुरू होता. काही महिन्यांपासून तो सावरण्याची शक्‍यता दिसत होती; परंतु दीड-दोन महिन्यांत त्याचे कंबरडे मोडल्याची भीती व्यावसायिक व्यक्त करत आहेत. निवासी प्रकल्पांवर मंदीची छाया आहे; व्यावसायिक वापराच्या प्रकल्पांबाबतही ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण खरेदीदार स्वीकारत असल्याचे बोलले जात आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवे बुकिंग आणि गृहप्रवेश होतात; मात्र यंदा चित्र वेगळे दिसते. आता आता ग्राहक या क्षेत्राकडे परतू लागले होते; त्यात कोरोनाचा स्पीडब्रेकर आडवा आला आहे, अशी प्रतिक्रिया असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

दीर्घकालीन परिणाम अज्ञात
व्यावसायिक संकुलांसाठी मागणी कायम आहे; मात्र आता प्रवासबंदीमुळे प्रत्यक्ष खरेदीचे निर्णय लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम होतील, असे मत नाईट फ्रॅंक इंडिया या रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी व्यक्त केले. या संकटाचा फटका किती बसेल, हे आताच सांगता येत नाही, असेही ते म्हणाले. 

गृहनिर्माण क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न असलेले वेगवेगळ्या अडीचशे उद्योगांत देशात दुसऱ्या क्रमांकाची रोजगारनिर्मिती होते. या क्षेत्रासाठी सवलती सरकारने जाहीर कराव्यात. 
- डॉ. निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष, असोचेम.

गेल्या काही तिमाहींमध्ये गृहनिर्माण क्षेत्रासमोर आशादायक चित्र होते; मात्र आता ही गती कमी होईल. नागरिकांवरील निर्बंध आणि अन्य कारणांमुळे घरांची विक्री कमी होईल.
- अशोक मोहनानी, उपाध्यक्ष,  नरेडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी मे महिन्यात येणार सोलापुरात; विद्यापीठाने पाठविले पंतप्रधानांच्या सचिवांना पत्र; आता कोंडीपासून होणार थेट रस्ता, वाचा...

Amravati Accident : भीषण अपघात ! चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन ७० फूट दरीत कोसळले, चार जण जागीच ठार

मोठी बातमी! अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा; थकबाकीमुळे २५ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद, कशी असणार कर्जमाफी, वाचा...

T20 WC, IND vs SA: 'पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण...', सूर्यकुमारने द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे काय सांगितले कारण?

Healthy Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी, सकाळी नाश्त्यात 15 मिनिटांत बनवा 'छोले सॅलड', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT