Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjan sakal media
मुंबई

मुंबईत बाप्पाचं विसर्जन शांततेत; ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना महामारीत (Corona pandemic) गणेशोत्सव साजरा (Ganpati festival) होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. यंदाही बाप्पांच्या विसर्जनासाठी (Ganpati visarjan) ढोल नाही, डिजे नाही, मोठ-मोठे लाऊडस्पीकर नाही, गर्दी नाही आणि त्यासोबत ध्वनी प्रदूषण (noise pollution) ही नाही. याचा सकारात्मक परिणाम मुंबईतील ध्वनी प्रदूषणावर झाला आहे. आवाज फाउंडेशनच्या (awaaz foundation) मते मुंबईकरांना आता फक्त कोरोनाचेच नाहीतर आरोग्याचेही महत्त्व पटले असून त्यांनी स्वत: हून आवाज करणे टाळले आहे.

ध्वनी प्रदूषणाचा परिणाम फक्त कानांवर होत नाही तर आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करतच यंदा अनंत चतुर्थीच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सध्या मुंबईसह राज्यावर कोरोनाचे सावट आहे. यामुळे, गणेशोत्सव ही अगदी साध्या आणि नियमांचे पालन करुन साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करत यावर्षी गणेशोत्सव साजरा केला गेला.

आवाज फाउंडेशनने नोंदवलेल्या अहवालानुसार, दुसऱ्यांदा एवढ्या कमी आवाजात विसर्जन पार पडले आहे. नागरिकांना आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागृती झाली आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या चौपाट्यांवरही लोकांनी गर्दी टाळली. सोबतच आवाज करणाऱ्या गोष्टीही दूर ठेवल्या. यापुढच्या गणेशोत्सवाच्या कालावधीतही गणपती मंडळांकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आवाज फाउंडेशनच्या या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि संयोजक सुमेरा अब्दुलाली यांनी व्यक्त केली आहे.

यंदा आवाज फाउंडेशनने मुंबईतल्या अनेक गणेशमूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची नोंदणी केली आहे. मात्र, यंदा गणपती विसर्जन शांततेत पार पडले असल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने जाहीर केला आहे. अनेक गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी नव्हती. तसेच, कुठेही लाऊडस्पीकर किंवा मोठा आवाज करणाऱ्या वाद्यांचा उपयोग झाला नाही.

गिरगाव चौपाटीवर सर्वाधिक आवाजाची नोंद

सर्वाधिक आवाजाची नोंद ही गिरगाव चौपाटीवर केली गेली. मात्र, ती ही आवाजाची पातळी 100 डेसिबलच्या खाली होती. गेल्या 18 वर्षांतील सर्वात शांतमय विसर्जन सोहळा झाल्याचेही आवाज फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे. गिरगाव चौपाटीवर 93.1 डेसिबल एवढे ध्वनी प्रदूषण नोंदवण्यात आले. पण, तिथे ट्रॅफिक मधला आवाज होता.

आवाज फाउंडेशनचा अहवाल  (डेसिबलमध्ये)

ठिकाण डेसिबल

राम मंदिर लेन 77

वरळी अॅट्रिया मॉल 76

हाजिअली 88

गिरगाव चौपाटी 93.1 (सर्वाधिक)

गिरगाव विसर्जन ठिकाण 86.9

हाजिअली 85

शिवाजी पार्क 80

गणेशोत्सव या वर्षी 2020 सालापेक्षाही अधिक शांत होते, जवळपास कोणत्याही ध्वनिक्षेपक किंवा इतर गोंगाट करणारी साधनांचा वापर केला गेला नाही. हाजी अली विसर्जन ठिकाणाजवळ एका मिरवणुकीद्वारे मंदिराची घंटा सतत वाजवली जात होती आणि इतर ठिकाणी सतत हॉर्न वाजवले जात होते. गिरगाव चौपाटीच्या प्रवेश द्वारावर 93.1 डेसिबल एवढी सर्वोच्च पातळी नोंदवली गेली. याठिकाणी गाड्यांचे हॉर्न्स वाजवले जात होते, असेही अब्दुलाली यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT