police
police 
मुंबई

कोरोनामुळे खाकी वर्दीची दमछाक, अतिरिक्त कामामुळे मनोबल ढासळतंय

सकाळवृत्तसेवा

ठाणे : "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद जपत गेले अडीच महिने गुन्हेगारीसह, कोरोनासारख्या संकटात रस्त्यावर उतरून पोलिस सर्वसामान्यांचे रक्षण करत आहेत. लॉकडाऊन काळात नियमित कामकाजासह नाकाबंदी, गस्त आणि बंदोबस्ताच्या गर्तेत अडकलेल्या पोलिसांवर स्थलांतरण करणाऱ्यांच्या ई-परवान्याची जबाबदारी टाकून या त्यांना रेल्वेत आणि राज्याच्या सीमेवर सोडणाऱ्या एसटी बसमध्येही बसवण्याचा बोजाही टाकण्यात आला आहे. आता मद्यविक्रीचा गोंधळ टाळण्याची कामदेखील त्यांच्याच शिरावरटाकल्याने पोलिसांनी काय... काय करायचे, अशी हतबलता व्यक्त होत आहे. सततच्या कामामुळे दमछाक होऊन पोलिसांचे मनोबल ढासळू लागले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे पोलीस दलातील 7 ते 8 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर भागात अहोरात्र नियंत्रण कक्षातील तक्रारींचे निराकरण करण्यासह नेमून दिलेल्या ठिकाणांवर पोलिस बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत आहेत. तरीही, पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी अनेकजण क्षुल्लक कामांसाठी घराबाहेर पडत असल्याने त्यांनाही रोखण्यासाठी पोलिसांना धावाधाव करावी लागत आहे.

तिसऱ्या लॉकडाऊनच्या शेवटच्या कालावधीत परराज्यातील स्थलांतरीत श्रमिक आणि अडल्या- नडलेल्याना ई-पास देण्याचा अतिरिक्त भार सोपवल्याने पोलिसांना जराही उसंत मिळेनाशी झाली आहे. तब्बल 4 लाख ई -पासचे अर्ज हाताळल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. हे परवाने दिल्यानंतर या श्रमिकांना रेल्वेत बसवण्यासह ठिकठिकाणाहुन राज्यांच्या सीमेपर्यत जाण्यासाठी एसटीत बसवण्याची जबाबदारीही पोलीसांनाच पार पाडावी लागत आहे. ठाण्यात एसटीमध्ये मजुरांना सोडताना एका पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. आता तर, ऑनलाईन मदय विक्रीची अनुमती दिली असल्याने,इथला गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे सुचवण्यात आल्याने पोलिसांचा व्याप आणखी वाढला आहे. या संदर्भात पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना छेडले असता, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण वाढल्याची कबुली दिली.

पोलिसही माणूसच आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासह कामाचा ताण कमी करण्याबाबत उपाययोजना करायला हव्यात. त्याचबरोबर, पोलिसांना कर्तव्य बजावण्यासाठी सुरक्षित साधने पुरवणे गरजेचे आहे.
- डॉ. सॅम पिटर न्यूटन, मानसोपचारतज्ज्ञ

Corona suffocates the police, overwork demoralizes them

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT