corona vaccine sakal media
मुंबई

मुंबईत अवघ्या तीन तासात ६९,५१५ नागरिकांना दिली लस

60 हजारांहून अधिक नागरिकांना मिळाली लस

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत लसींचा तुटवडा (less corona Vaccines) भासत असल्याने आज फक्त तीन तास लसीकरण मोहिम (vaccination Drive) सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही मुंबईने लसीकरणात (Mumbai Vaccination) 60 हजार नागरिकांना लस देण्याचा टप्पा गाठला आहे. मुंबईत दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या लसीकरणातून 69, 515 नागरिकांचे लसीकरण (people vaccination) केले गेले. ( Corona Vaccination resumes slowly in mumbai above sixty thousand people vaccinated )

सोमवारी लस उपलब्ध नसल्यामुळे फक्त मोजक्याच ठिकाणी लसीकरण झाले. त्यामुळे, रांग लावूनही लस न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर, पालिकेकडून आज फक्त तीन तास लसीकरण होईल असे जाहिर केले. मात्र, आज (बुधवारी) पुन्हा एकदा लसीकरण रोजच्या वेळेनुसार होणार असून 9 ते 5 या वेळेत लाभार्थ्यांना लस घेता येईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, लशीचे सोमवारी रात्री उशिरा 95,000 डोस मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानुसार, बुधवारी लसीकरण सुरळीत होऊ शकेल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. रोज एक लाख जणांचे लसीकरणाचे लक्ष्य पालिकेचे आहे. मात्र, लशीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. दरम्यान, लशीसाठी रांगा लावूनही घरी परतावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  आज दिवसभरात 866 परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले गेले.

आतापर्यंत झालेले लसीकरण- 57,93,487

हेल्थ केअर वर्कर्स- 317980

फ्रंटलाइन वर्कर्स- 376655

60 वर्षांवरील नागरिक- 1456842

45 ते 59 वयोगटातील नागरिक- 1693170

18 ते 44 वयोगटातील नागरिक- 1937410

स्तनदा माता - 3417

विद्यार्थी - 7923

दिव्यांग किंवा शारीरिक हालचाल न करणारे - 90

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT