मुंबई, ता. 11: कोरोनाच्या लसीबाबत मुंबई महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडली. मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाचं पहिल्या टप्प्यातलं नियोजन कसं करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात मुंबईतल्या सव्वा लाख आरोग्य सेवकांचं लसीकरण केलं जाणार आहे. याशिवाय या लसीकरणासाठी महापालिकेच्या 3 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं समजतंय. मुंबई महापालिकेकडे लसीकरणाची ब्ल्यू प्रिंट तयार असून त्यासाठी दहा विशेष तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. याशिवाय लशीची साठवणूक, वाहतूक आणि लशीच्या हाताळणीची व्यवस्था करण्यात येतेय. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यात केईएम, नायर, तसंच सायन आणि कूपर रुग्णालयात लशीचा साठा करण्यात येईल.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सुरवातील आठ ठिकाणी लसीकरणाची सोय उलपब्ध करुन देण्यात येणार आहे. तीसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील तसेच सहव्याधी असलेल्या नागरीकांचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कडक सुरक्षेत हे लसीकरण करण्यात येणार असून लस घेतल्यानंतर संबंधीत व्यक्तीला 30 मिनीट तेथेच थांबावे लागणार आहे.
महत्त्वाची बातमी : शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू; चित्रविचीत्र, नक्षीकाम किंवा चित्र असलेले कपडे परिधान करण्यास मनाई
कोविड लसीकरणाबाबत राज्य सरकारची टास्क फोर्स आणि पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पालिकेने लसीकरणाचा कृती आराखडा सादर केला. कांजूरमार्गसह दोन ठिकाणी लस साठवणुक केंद्र तयार करण्यात येणार आहे. तर, शहर विभागातील चार प्रमुख रुग्णालयासह उपनगरातील चार रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी लसीची वाहतुक, साठवणुक याच्या तयारीची माहिती टास्क फोर्सला देण्यात आली. त्याचबरोबर दिल्लतील पथकानेही पालिकेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. राज्याची टास्क फोर्स आणि दिल्लतील पथकाने काही सुचना केल्या असून त्याची अमंलबजावणी करता येईल असेही पालिकेडून सांगण्यात आले.
लसीकरण मोहिमेचे पाच टप्पे असून पहिल्या दोन टप्प्यात साठवणुक आणि वाहतुक यांचा समावेश आहे. तसेच, त्यानंतर तीन टप्यात प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार आहे. सुरवातील 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली लस देण्याचे काम 10 ते 15 दिवसात पुर्ण होणार आहे. अशी माहिती काकाणी यांनी दिली.
महत्त्वाची बातमी : "केंद्राची भूमिका अनुकूल दिसत नाही, सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये" : शरद पवार
मुंबई महापालिकेची कोरोना लसीकरणाची 'ब्ल्यू प्रिंट' तयार;
पहिला टप्पा
दुसरा टप्पा
तीसरा टप्पा
असे होईल लसीकरण
माेफत लसीचा निर्णय सरकार घेणार ?
नागरीकांना लसीकरण करण्याबाबत अद्याप आराखडा तयार केलेला नाही. तसेच, नागरीकांनाही लस मोफत मिळणार का हेही अद्याप ठरलेले नाही. ‘लस मोफत असेल अथवा त्याचे शुल्क घेतले जाईल, याबाबतचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेईल, असेही काकाणी यांनी सांगितले. त्यामुळे तीसऱ्या टप्प्यात सामान्य नागरीकांना दिली जाणारी लस मोफत असेल का शुल्क असेल हे अद्याप ठरलेले नाही.
महत्त्वाची बातमी : मुंबईत रात्रीचा कर्फ्यु लागणार ? लाईफलाईन लोकल ट्रेनही सुरु करण्याचा विचार न्यू ईयर नंतरच !
खासगी कंपन्यांना लांब ठेवणार
या लसीकरण मोहीमेत खासगी अथवा कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेणे महापालिका टाळणार आहे. या कामात जास्तीत जास्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लसीकरणासाठी अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. हे पालिकेचे कर्मचारी असतील. त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. लसीकरणा प्रत्येक कामात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सामावेश करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे असेही काकानी यांनी सांगितले.
जंम्बो कोविड केंद्रात लसीकरण
मुंबई सेंट्रल येथील नायर दंत रुग्णालय, नायर सर्वसाधारण रुग्णालय, परळ येथील केईएम आणि शिव येथील लोकमान्य टिकळ रुग्णालयात लसीकरण होईल. तर, उपनगरातील कुर्ला भाभा, विद्याविहार राजावाडी, वांद्रे भाभा आणि जागेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात लसीकरण करण्यात येईल. त्याचबराेबर जंम्बो कोविड केंद्रांमध्येही लसीकरण केंद्र तयार करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरणासाठी केंद्र सरकारने साॅफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये लस देण्यात येणाऱ्या व्यक्तीची माहिती पूर्वीपासूनच संग्रहित असेल. त्या व्यक्तीला मोबाईलवर ओटीपी क्रमांक पाठवला जाईल. केंद्रात या क्रमांकाची शहानिशा लसीकरण केंद्रात केली जाईल. क्रमांकाची खात्री झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला लस देण्यात येईल. मोबाइल नसलेल्यांसाठी पिन कोड अथवा इतर क्रमांकाचा वापर करण्याचा विचार आहे.
( संपादन - सुमित बागुल )
corona virus vaccination blue print for mumbai ready know various stages of covid 19 vaccination
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.