ते म्हणतात, मोदीजी... असे केल्यास देश अंधारात जाईल!  
मुंबई

ते म्हणतात, मोदीजी... असे केल्यास देश अंधारात जाईल!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना कोरोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या लावण्याचे आवाहन केले आहे; परंतु एकाच वेळी सर्व दिवे बंद झाल्यास विजेची मागणी एकदम कमी होऊन निर्मिती व पुरवठ्याचे गणित बिघडेल. राज्य आणि मध्यवर्ती ग्रिड कोलमडून देश अंधारात जाईल, अशी भीती महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी फेरविचार करून दिवे बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावण्याचा पर्याय निवडावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. 

लॉकडाऊनमुळे राज्यातील विजेची मागणी 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने इंडस्ट्रिअल लोड कमी झाला आहे. सध्या महानिर्मिती कंपनी 3040 मेगावॉट एवढीच वीजनिर्मिती करत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पॉवर ग्रिड व इतर खासगी कंपन्यांकडून बाकीची वीजनिर्मिती होते. विजेची मागणी कमी झाल्यामुळे महानिर्मितीला अनेक संच बंद व "स्लो डाऊन' करावे लागले आहेत. सध्या विजेचा वापर फक्त अत्यावश्‍यक सेवा, घरगुती व शेतीच्या वापरासाठी होत आहे. 

अशा स्थितीत पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास ग्रिड कोलमडून सर्व वीजनिर्मिती केंद्र उच्च वारंवारितेवर बंद पडतील. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश अंधारात जाईल. महाराष्ट्रासारख्या विजेची मोठी मागणी असलेल्या राज्यात "ग्रिड फेल्युअर'मुळे सर्व निर्मिती संच बंद पडल्यास अनेक राज्यांतील वीजजाळे कोलमडण्याचीही शक्‍यता आहे. परिणामी रुग्णालयांसह सर्व अत्यावश्‍यक सेवा विस्कळित होऊ शकतात. या संभाव्यतेचा विचार केंद्र सरकारने करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा आणि सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केली आहे. 

पूर्ववत होण्यास आठवडा 
बंद पडलेले वीजनिर्मिती संच पुन्हा कार्यरत होण्यासाठी 12 ते 16 तास लागतात. त्यानुसार परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी एक आठवडा लागेल, अशी शक्‍यता वीज कर्मचारी महासंघाने वर्तवली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT