मुंबई

बाबांबानो कोरोनाला वय वगैरे कळत नाही; कोरोनाबाबतची 'ही' माहिती वाचा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे ३३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या या लोकांमध्ये बहुतांश लोकं ६० किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे सिनियर सिटीझन असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता जगभरातून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनामुळे कमी वय असलेल्या आणि फिट असलेल्या तरुणांचाही मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येतेय.

कोरोनाचा धोका फक्त वयाची साठी ओलांडलेल्या लोकांनाच आहे असा काहींचा समज आहे. म्हणूनच काही तरुण मंडळी कुठलीही पर्वा मी करता पार्टी करत राहिले आणि एकमेकांच्या संपर्कात येत राहिले. त्यामुळे काही देशांमध्ये तरुणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर इटली आणि स्पेन या देशांमध्ये अधिक तरुणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ज्या देशांमध्ये आरोग्य सेवा चांगल्या नाहीत त्या देशांमध्ये जास्तीत जास्त तरुणांचे मृत्यू होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे काही तरुणांमध्ये कोरोनाचे काहीही लक्षणं दिसत नाहीत. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबत वारंवार सांगण्यात आलंय. WHO च्या म्हणण्यानुसार तरुणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र असे तरुण इतरांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण होते. तसंच काही तरुणांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असेल तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. काही देशांमध्ये कोरोनामुळे तरुणांचा मृत्यू झाला आहे.

एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दर ५०० कोरोनाग्रस्तांच्या मागे १०० कोरोनाग्रस्त हे २० ते ४४ या वयोगटातले आहेत. तसंच आयसीयूढे असलेल्या एकूण रुग्णांमध्ये प्रत्येक १० रुग्णांमागे १ रुग्ण तरुण आहे. त्यामुळे कोरोनाची लागण फक्त ६० वर्षांच्या वरच्या वयाच्या  लोकांना होतो हा दावा खोटा ठरतोय.

आतापर्यंत अमेरीका, स्पेन, इटली आणि चीन या देशांमध्ये अनेक तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात काही भारतीय वंशांचे तरुणही आहेत. त्यामुळे फक्त वृद्ध लोकांनाच नाही तर तरुणांनाही काळजी घेण्याची गरज आहे.

covid 19 youngsters are getting novel corona virus infection read full report

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT