hospital 
मुंबई

गंभीर रुग्णांना उपचारांची प्रतीक्षा, मुंबईतील रुग्णालयांत जागाच नाही

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबईतील सर्व रुग्णालये भरली आहेत. खाटा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर कोव्हिड रुग्णांची फरपट होत असल्याचे दिसते. सरकारी आणि खासगी रुग्णालयांतही हीच परिस्थिती आहे. मुंबईतील कोव्हिड-19 विषाणूग्रस्त रुग्णांत दररोज वाढ होत आहे. अन्य गंभीर आजारांचे रुग्णही मोठ्या संख्येने आहेत. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत आहेत. परंतु, रुग्णालयांत खाटा नसल्याचेच उत्तर दिले जात आहे.

महापालिकेने काही रुग्णालयांतील खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केईएम, नायर, सायन आणि सेव्हन हिल्स या रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांनाही कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. महापालिकेने कोरोनाच्या तीव्र लक्षणे असणाऱ्या व गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेले 10,883 रुग्ण असून, त्यापैकी 3200 जण गंभीर आहेत. कोव्हिड रुग्णालयांत गंभीर रुग्णांसाठी 4750 खाटा आहेत. त्यापैकी 1750 खाटा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांची वाढती संख्या पाहता या खाटाही कमी पडू लागल्या आहेत. 

सरकारी रुग्णालयांत खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनाही क्षमता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, आणखी डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी आणायचे कुठून, असा प्रश्न खासगी रुग्णालयांनी उपस्थित केला आहे. सेंट जॉर्जेस कोव्हिड रुग्णालयातील सर्व 102 खाटा भरल्या आहेत. त्यापैकी 26 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गंभीर रुग्णाला अतिदक्षता विभाग उपलब्ध होईपर्यंत कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये ठेवले जाते. अशा रुग्णाला अधिक काळ कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये ठेवता येत नाही. या रुग्णालयात आणखी 24 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. एका पाळीत 25 डॉक्टर सेवा देत आहेत. परंतु, आणखी वैद्यकीय कर्मचारी कुठून आणायचे, असा पेच प्रशासनापुढे आहे. 

त्रिस्तरीय उपचार प्रणाली
कोव्हिड-19 रुग्णांवर कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड सुविधा केंद्र आणि कोव्हिड रुग्णालय अशा तीन स्तरांवर उपचार करण्यात येत आहेत. कोव्हिड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यात येते. या केंद्रांत 14 हजार खाटांची व्यवस्था आहे. ताप असणाऱ्या मात्र श्वसनाचा त्रास नसणाऱ्या रुग्णांसाठी कोव्हिड सुविधा केंद्रांमध्ये 10 हजार खाटा आहेत. गंभीर रुग्णांना कोव्हिड रुग्णालयांत दाखल करण्यात येते; तेथे 4750 खाटा उपलब्ध आहेत.

खाटा वाढवण्याचा प्रयत्न
महापालिकेने वरळीतील एनएससीआय सेंटरमध्ये आयसीयू व ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध कररून दिली आहे. सध्या तेथे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. कोव्हिड केअर युनिटमधील खाटांची संख्या 34 हजारांपर्यंत वाढवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

Critical patients waiting for treatment, there is no space in Mumbai hospitals

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT