मुंबई

ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये वाहनांची गर्दी! मॅकेनिकची मात्र वनवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः लॉकडाऊन खुले होत असल्याचा आवाज आता रस्त्यावर ऐकू येत आहे. विविध गॅरेजमध्ये येत असलेल्या ठोकाठोकीचा आवाज जनजीवन सुरळीत होत असल्याचे संकेत देत आहेत. मात्र गॅरेज दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरीता बंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अनेक गाड्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येत आहेत. गाड्यांचे मालक आपले वाहन लवकर दुरुस्ती करुन देण्यासाठी तगादा लावत आहेत, पण अनेक गॅरेजमधील मेकॅनिक गावाला निघून गेले आहेत, त्यामुळे जास्तीचा ताण सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येत आहे आणि वाहन दुरुस्तीस जास्त वेळ लागत आहे. 

ग्रँट रोड तसेच कुर्ला डेपोपासून गरोडिया नगरपर्यंतची स्पेअर पार्टस््ची दुकाने ऊघडली आहेत. दुकाने ऊघडली आहेत, पण दुरुस्ती करणारे हात कमी झाले आहेत. गॅरेज मालकांनुसार 50 ते 70 टक्के मेकॅनिक गावी गेले आहेत. त्या मेकॅनिकनी परत यावे यासाठी गॅरेज मालक प्रयत्नशील आहेत. काही युवा मेकॅनिक गावाहून परतण्यास सुरुवात झाली आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक वाहने जागेवरच थांबलेली होती. त्यामुळे दुरुस्तीची कामेही जास्त वाढली आहेत. त्यातच उपनगरी सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहनांना जास्त पसंती देणे भाग पडत आहे. मेकॅनिकवरील ताण वाढत आहे, पण त्यांना हाताला काम मिळाल्याचे जास्त समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

Kolhapur News: आई मला निदान तोंडाने तरी शेवटचा श्वास दे गं, तरुण मुलाचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा आरोप, दवाखाना सील

SCROLL FOR NEXT