corona patients  
मुंबई

विक्रोळीत निर्जंतुकीकरण न करताच होतायत कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार; स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या लोकांना कोरोनाच्या संसर्गाची भीती..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: विक्रोळीच्या पूर्वेस असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कोरोनाच्या मृतदेहाचे प्रमाण वाढले आहे. या स्मशानभूमीलगत झोपडपट्टी आहे. स्मशानभूमी परिसराचे निर्जंतुकीकरण होत नसल्याने या वस्तीतील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. 

विक्रोळीच्या या स्मशानभूमीलगत टागोर नगर ग्रुप नंबर 7 इंदिरानगर या दाट वस्त्या आहेत. काही इमारती आणि चाळी आहेत. या स्मशानभूमीत धारावी, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर  आदी ठिकाणांहून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. या ठिकाणी विद्युत दाहिनी असल्याने आता या स्मशानभूमीत आणल्या जाणाऱ्या मृतदेहाचे प्रमाण वाढले आहे.

इथे दररोज आठ ते दहा मृतदेह आणले जात आहेत. स्मशानभूमीच्या गेटवर रुग्णवाहिका थांबवून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. रुग्णवाहिकेसोबत आलेले कर्मचारी स्मशानभूमीच्या बाहेर रेंगाळत असतात. आजूबाजूने त्या वस्त्यातील स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असते. अंत्यविधीनंतर त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जात नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाटत आहे. 

विक्रोळीतल्या ६ जणांचा मृत्यू:

विक्रोळीच्या पूर्व भागातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर भागात गेल्या पंधरा दिवसात 6 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. कोरोनाचे रुग्ण या भागात वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

हेही वाचा: तळीरामांनी काढली कसर ! अवघ्या २४ तासात ५ हजार जणांना घरपोच मद्याची डिलिव्हरी.. 

"मुंबईच्या विविध भागातून विक्रोळीच्या स्मशानभूमीत कोरोनाचे मृतदेह आणले जात आहेत. स्मशानभूमीला लागून लोकवस्ती असल्याने कोरोनाचा मोठा धोका स्थानिकांना निर्माण झाला आहे. समशानभूमी परिसरात निर्जंतुकीकरण वारंवार केले जावे. पालिका आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबींकडे लक्ष द्यावे", असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव ससाणे यांनी म्हंटलंय. 

deadbodies of corona patients burned withour sanitization in vikroli Cremation ground people are scared read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT