dharavi  
मुंबई

Coronavirus : धारावीत मृतांचा आकडा अटोक्यात, दिवसभरात 'इतक्या' नव्या रुग्णांची भर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : धारावीमध्ये आज पुन्हा एकदा नवे 38 रुग्ण सापडल्याने  एकूण रुग्णांचा आकडा 1621 इतका झाला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 60 इतका आहे. धारावीतील बाधित रुग्णांच्या सहवासितांची तपासणी करण्यात येत असून त्यातील संशयित रुग्णांना क्वारंटाईन केले जाते. त्यांच्यातून हे बाधित रुग्ण सापडत असल्याची माहिती पालिकेने दिली. आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी अधिकतर रुग्ण हे माटुंगा लेबर काम, धारावी कोळीवाडा, पीएमजीपी कॉलनी, मुकुंद नगर, सुभाष नगर या परिसरात सापडले आहेत. 

माहीम मध्ये 24 रुग्णांची भर
माहीम परिसरात आज 24 नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णांचा आकडा 375 वर पोचला आहे.  मोरी रोड, एमराल्ड कोर्ट, न्यु माहीम पोलीस कॉलनी आणि माहीम कॉजवे परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडा 8 इतका आहे.

दादरमध्ये 6 नवे रुग्ण
दादर परिसरात ही आज 6 नवे रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 245 वर पोहोचली आहे. सुखशांती बिल्डिंग, उत्तुंग टॉवर, वसुदेवन निकेतन, कासारवाडी, जोशीला बिल्डिंग मध्ये हे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडा 7 इतका आहे.

death toll due to corona in Dharavi is staggering, adding 38 new corona patients throughout the day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT