Dharavi 
मुंबई

Dharavi Bachav Morcha: "भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी मुंबई महाराष्ट्रानं मिळवली नाही"; ठाकरेंची सडकून टीका

धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समुह करणार आहे, याला ठाकरेंच्या शिवेसनेनं विरोध केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समुह करणार आहे. याला शिवेसनेनं विरोध केला असून यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी ते बीकेसीतील अदानी समुहाचं कार्यालय इथपर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या मोर्चाची सांगता झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी महाराष्ट्रानं मुंबई मिळवली नाही, अशा शब्दांत हल्लाबोल केला. (Dharavi Bachav Morcha Maharashtra did not get Mumbai to lease BJP son in law adani says Uddhav Thackeray)

एवढी गर्दी का झाली?

उद्धव ठाकरे म्हणाले, अनेकांना या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली आहे? हेच कळत नाहीए. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, १९६० साळी मुंबई महाराष्ट्र मिळवली. मराठी माणसानं रक्त सांडलं, १०५ हुतात्मे झाले, हे हुतात्मा स्मारकं तिकडं आहे ते कोणाचातरी पुतळा उभा करायचा म्हणून केलेलं नाही. (Latest Marathi News)

आंदण देण्यासाठी मुंबई मिळवली नाही

तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिल, रक्त सांडलं म्हणून आपण तिथं जाऊन वंदन करतो. त्या लढ्यात भाजप कुठेही नव्हता. लढायची वेळ आली की भाजप कुठेही नव्हता. मग ती दंगल असो काहीही असो. विकायची वेळ आली की हे पटापटा पुढे येतात.

पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणूस, गिरणी कामगारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ती भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी नाही. भाजपच्या जावयाला आदानीला हुंड्यात द्यायला म्हणून दिलेली नाही. (Marathi Tajya Batmya)

मुंबईला संपवण्याचा भाजपचा डाव

ही आम्ही कमावलेली मुंबई आहे, याद राखा जर आमच्या मुंबईला हात लावण्याची हिम्मत केली तर तोडण्याची तर भाषाच करु नका. जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, हा प्रश्न फक्त धारावीचा नाही हा मुंबई संपवण्याचा डाव आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT