note sanitization 
मुंबई

नोटांना सॅनिटायझर लावताय? तर थांबा; बॅंकिंग क्षेत्रातील जाणकारांनी दिली महत्वाची माहिती...

मयुरी चव्हाण काकडे

कल्याण : लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता बाजारात नागरिकांचा वावर वाढला असून दैनंदिन व्यवहारही सुरू झाले आहेत. ठाणे,  कल्याण-डोंबिवली शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा झाली असली तरी अत्यावश्यक सेवा या सुरूच राहणार आहेत. सद्या नागरिक सुरक्षा म्हणून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करत असून नोटांवरही सॅनिटायझर मारू लागले आहेत. मात्र असे केल्याने नोटा खराब होण्याच्या तक्रारीही वाढल्या असून नोटांना सॅनिटायझर लावू नका, असा स्पष्ट सल्ला बँक क्षेत्रातील जाणकार देत आहेत. 

नोटांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होतो हे अद्याप स्पष्ट झाले नसून आरबीआयनेही याबाबत कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत. दरम्यान बँकामध्ये नोटांची देवाणघेवाण अधिक होते. मात्र आम्ही नोटांना सॅनिटायझर न लावता हाताला सॅनिटायझर लावतो व हॅन्डग्लोजचा वापर करतो अशी माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांसह दुकानदार , व्यापारी नोटांवर वाटेल तितका सॅनिटायझर मारू लागले आहेत. त्यामुळे अनेक नोटांचा रंग काहीसा उडाला असून नोटा खराब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे बँकातून सांगण्यात आले. तसेच चेकचे व्यवहार करतानाही चेक वरील शाई उडू नये याकरिता सॅनिटायझर मारणे टाळले पाहिजे असे मत ही जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

सॅनिटायझर मध्ये केमिकल असल्याने त्यामुळे नोटांचा रंग उडतो. बँकेमध्येही कर्मचारी नोटांना सॅनिटायझर न लावता हाताला लावतात. नोटा खराब होणे टाळायचे असल्यास त्यावर सॅनिटायझक मारणे नागरिकांनी बंद करावे. 
- प्रणय भोसले, बँक कर्मचारी 

दुकानात अनेक प्रकारचे ग्राहक येतात यातील काही रेड झोन मधूनही येतात. त्यामुळे थोडा सॅनिटायझर आम्ही नोटांवर मारायचो. त्यामुळे नोटा काहीशा खराब झाल्या पण आता हातालाच सॅनिटायझर लावा असे बँकेतील कर्मचा-याने सांगितल्याने ही पद्धत अवलंबली आहे. 
- जिग्नेश शहा, व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT