corona and social media 
मुंबई

कोरोनावर समाज माध्यमी उपचार नकोच; उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा...

समीर सुर्वे

मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोनाचे संकट असताना अनेकजण स्वतःसह कुटुंबाचीही काळजी घेताना दिसत आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून प्रतिकारशक्ती अबाधित राहण्यासाठी काहीजण विविध उपाय योजत आहे. काही लोक घरीच स्वतःहून उपचार करत असल्याचे प्रकारही घडत आहेत. दरम्यान या काळात समाज माध्यमांवर स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. अशा डॉक्टरांच्या उपचारांचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. 

आयुर्वेदाच्या नावावर विविध काढे, औषधे देण्याचा सल्ला सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्याच बरोबर कोव्हिडच्या रुग्णांना दिली जाणारी औषधे साधा ताप-सर्दी आल्यावरही घेण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे नागरिक सुरुवातीला एक-दोन दिवस घरीच उपचार करतात. मात्र, त्रास वाढल्यावर डॉक्टरचा सल्ला घेतला जातो. तसेच काढे घेऊन काही केलं तरी कोव्हिड होणार नाही, असा समजच नागरीकांनी करुन घेतल्याचे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ सांगतात.

फ्ल्यू सदृष्य म्हणजे ताप, सर्दी खोकला सारखी लक्षणं असल्यास तत्काळ वैद्यकिय सल्ला घेण्याचा नियम सरकारने केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे इंडियन मेडिकल असेसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

काही रुग्ण कोरोना झाल्यावर आम्ही काढा, औषधे घेतली, तरी कोरोना कसा झाला, असा प्रश्न विचारतात. त्यामुळे समाजमाध्यमांवरुन अनेक गैरसमज निर्माण झाल्याचे लक्षात येते, असेही डॉ.भोंडवे यांनी नमुद केले. समाजमाध्यमांवर अवलंबून राहाताना नागरिक आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत. मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, सुरक्षित अंतर अशा आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचेही डॉ.भोंडवे सांगतात.

व्हिडिओ: दिल्ली-मुंबई प्रवास अवघ्या १३ तासात, गडकरींनी शेअर केली ब्लू-प्रिंट

शास्त्रीय माहिती द्यावी 
अनेक देशांमध्ये रोज किंवा ठराविक दिवसांनी शास्त्रज्ञांकडून कोव्हिड बाबत शास्त्रीय माहिती जाहीर केली जाते. मात्र, भारतात अशी माहिती दिली जात नाही. अशा प्रकारची माहिती देऊन नागरीकांमधील गैरसमज दूर करावे, असेही डॉ.आविनाश भोंडवे यांनी सांगितले.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT