मुंबई

नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. रमेश भारमल; तर डॉ. जोशींकडे शीव रुग्णालयाचा कार्यभार 

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील कोरोना नियंत्रणासाठी 17 एप्रिलला डॉ. भारमल यांना नायरच्या अधिष्ठातापदावरुन मुक्त करुन तिन्ही वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तेव्हा ते कोणत्याच रुग्णालयाचे अधिष्ठाता नव्हते. त्याच दिवशी डॉ. मोहन जोशी यांनी शीव रुग्णालयाचा पदभार सोडून ते नायरला अधिष्ठाता म्हणून रुजू झाले. तर शीव रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. प्रमोद इंगळे रुजू झाले होते.. 

त्यानंतर आता नायर रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी पुन्हा डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूर्वी ते शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा कारभार सांभाळत होते. त्यांच्या जागी डॉ. मोहन जोशी यांनी कार्यभार स्वीकारला आहे. 

नायर रुग्णालयात एमआरआय मशिन युनिटमुळे अपघात होऊन राजेश मारू या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका डॉक्‍टरने रॅगिंगप्रकरणी आत्महत्या केली होती. या दोन्ही घटनांनंतर डॉ. भारमल यांच्याकडे संचालक पद सोपवण्यात आले होते. भारमल यांना संचालक पद देण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध असतानाही आयुक्तांनी त्यांना संचालक पदावर बसवले होते. मात्र, आता त्यांनी संचालक पदासह नायर रुग्णालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, 9 मे या दिवशी शीव रुग्णालयातील मृतदेह प्रकरणी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांना तातडीने काढण्यात आले. आणि त्याचवेळेस डॉ. भारमल संचालक पदासह शीव रुग्णालयाचे काम पाहत होते.

शीव रुग्णालयातील कोव्हिड 19 च्या मृतदेहाच्या बाजूला ठेवून दुसऱ्या रुग्णांवर उपचार होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओवरून सायन रुग्णालयाच्या एकूणच कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. शिवाय, प्रत्येक स्तरावरून त्यांच्यावर टीका केली गेली. रुग्णालयात उपचारांसाठी जायचे कसे ? असा प्रश्‍नदेखील विचारला गेला होता. हे सर्व प्रकरण डॉ. इंगळे यांना भोवले आणि त्यांच्या जागी डॉ. भारमल आले. पण आता डॉ. जोशी हे सायन रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी रुजू झाले आहेत. 


कोव्हिडसाठी शीव रुग्णालयात बदली करण्यात आली होती, पण आता पुन्हा नायरमध्ये रुजू झालो आहे. याचा आनंद होत आहे. विशेष अशी ही बदली नव्हती. मात्र, एवढ्या महिन्यांनी परत येऊन छान वाटत आहे. 
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय.

----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT