मुंबई,ता.25: कोविडमुळे मुंबई महापालिकेच्या 200 कर्मचार्यांच्या मृत्यू झाला आहे. तर 5 हजार कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. कोविडमुळे पालिकेच्या उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर घनकचरा विभागातील सर्वाधिक कामगार आणि कर्मचार्यांचा कोविडने बळी घेतला आहे. आतापर्यंत 200 कर्मचार्यांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली. तर 5 हजार कर्मचार्यांना कोविडची बाधा झाल्याचे सांगितले.
महत्त्वाची बातमी : मुंबई महानगरपालिकेच्या 'मिशन सेव्ह लाईव्हज' मुळे कोविड मृत्यूदर कमी करण्यास मदत - काकाणी
मुंबई पालिकेचे 40 हजारच्या आसपास डॉक्टरांसह सर्व विभागातील कर्मचारी थेट कोविडशी मुकाबला करत आहे. त्यांना पालिकेच्या आरोग्य सेविका, कंत्राटी कामगारांची साथ मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्यांना जेवण पुरविण्यापासून निर्जंतुकीकरण करणे, संशयीत रुग्ण शोधणे, प्रतिबंधित व्यस्तांचे नियोजन करणे अशी कामेही पालिका करत आहे.
महत्त्वाची बातमी : उदय सामंत यांची सुरक्षा वाढवली, धमक्यांचे फोन आल्यानंतर देण्यात आली Y अधिक एस्कॉर्टस सुरक्षा
राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोविडमुळे मृत झालेल्या कर्मचार्यााच्या वारसांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र, अद्याप या 200 कर्मचार्यांच्या वारसांनाही नुकसान भरपाई मिळालेली नाही असा दावा कामगार संघटना करत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
( संकलन - सुमित बागुल )
due to covid 19 novel corona virus bmc lost 200 workers says iqbal singh chahal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.