लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमची मागणी ५० टक्‍क्‍यांनी वाढली 
मुंबई

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमची मागणी ५० टक्‍क्‍यांनी वाढली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेले लोक करमणुकीचे साधन म्हणून ऑनलाईन गेमकडे वळले आहेत. मागील 15 दिवसांत ऑनलाईन गेमच्या मागणीत 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. पबजी, स्पार्टन पोकर, ल्युडो किंग, कॅण्डी क्रश, रमी या खेळांच्या वापरकर्त्यांमध्ये 20 ते 30 टक्‍क्‍यांची भर पडली आहे. 

लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. त्यामुळे समाज माध्यमे, ऑनलाईन गेमिंग आदी माध्यमांतून मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला जात आहे. आतापर्यंत युवावर्गातच क्रेझ असलेल्या ऑनलाईन गेमिंगकडे प्रौढ व्यक्तीही मोठ्या प्रमाणात वळल्या आहेत. या "मोठ्या' गेमर्सची संख्या 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे सांगितले जाते.

भारतात ऑनलाईन गेमिंग 10 वर्षांपासून असले, तरी मागील एक-दोन वर्षांतच "युजर्स' लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन, समाज माध्यमांची उपलब्धता, वेगवान इंटरनेट आदी सुविधांमुळे ऑनलाईन गेमिंग व्यवसाय भरभराटीला आला आहे. आता ऑनलाईन गेममध्ये वैविध्याची मागणी होत असल्याचे स्पार्टन पोकरचे व्यवस्थापकीय संचालक अमिन रोझानी यांनी सांगितले. 

ऑनलाईन गेम व्यवसायात भारत अजून मागे असला, तरी भविष्यात येथील बाजारपेठ झपाट्याने विकसित होणार आहे. ऑनलाईन गेमर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंत्रज्ञान विकसित होत असून, या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. 
- अमिन रोझानी, स्पार्टन पोकर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: किती राज्यांमध्ये सत्तांतर होईल?

Chhatrapati Sambhajinagar: नव्या योजनेतून जूनमध्ये नळाला पाणी; तांत्रिक कामे संथ, जलशुद्धीकरणासाठी केंद्राचे प्रमाणपत्रही आवश्यक

India Thomas Cup 2026: भारताचं सुवर्ण स्वप्न भंगलं! फ्रान्सने रोखला टीम इंडियाचा रथ; थॉमस कपमध्ये 'ब्राँझ'वर मानावं लागलं समाधान

Shirala Accident News : शिराळ्यात भीषण अपघात! भरधाव टेम्पोची धडक; घरचा आधार योगेशचा जागीच मृत्यू, ६ महिन्यात एकाच घरातील ४ जणांच्या मृत्यूने हळहळ

Infrastructure Success: ऋतुजा नागटिळक-ढोक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात चमकली; जगातील लांब बोगदा प्रकल्पात महत्त्वाची भूमिका, बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर!

SCROLL FOR NEXT