मुंबई

इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरु

तेजस वाघमारे

मुंबई : सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आज (ता. 9) पासून सुरू होणार आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक मंगळवारी (ता.8) जाहीर करण्यात आले. यंदा प्रवेशाची प्रक्रिया केवळ दोन फेरींमधून पूर्ण केली जाणार आहे. 9 ते 15 डिसेंबरपर्यंत नोंदणीची प्रक्रिया तर अर्ज पडताळणीची प्रक्रिया 16 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. 18 डिसेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेचा निकाल 28 नोव्हेंबरला जाहीर झाला. यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिराने सुरू झाल्या. यामुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्यानंतर सीईटी सेलने आता प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यानुसार मंगळवार MBA आणि आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सुरू झाल्यानंतर आता इंजिनीअरिंग आणि फार्मसीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात करण्यात येत आहे.

यंदा इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला तीन लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले होते. 

अशी आहे इंजिनीअरिंगची प्रवेश क्षमता..

  • राज्यातील महाविद्यालये… 330
  • प्रवेश क्षमता… 1 लाख 23 हजार 431

इंजिनियरिंग अभ्यासक्रमाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन नोंदणी - 9 ते 15 डिसेंबर
  • कागदपत्र पडताळणी - 9 ते 16 डिसेंबर
  • तात्पुरती गुणवत्ता यादी - 18 डिसेंबर
  • हरकती नोंदवणे - 19 व 20 डिसेंबर
  • अंतिम गुणवत्ता यादी - 22 डिसेंबर
  • कॅप राऊंड 1 साठी सीट मॅट्रिक्स जाहीर - 22 डिसेंबर
  • पहिली सामायिक प्रवेश फेरी - 23 ते 25 डिसेंबर
  • तात्पुरती प्रवेश यादी जाहीर - 28 डिसेंबर
  • हरकती व प्रवेश प्रक्रिया - 29 ते 31 डिसेंबर
  • कॅप राऊंड २ ला सुरुवात - 1 जानेवारी 2021

engineering and pharmacy admission starts from today check detail time table

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT