मुंबई

कायद्यापुढे सर्वजण सारखेच असतात; रियाच्या जामीन प्रकरणात न्यायालयाचे एनसीबीला खडेबोल

सुनिता महामुनकर

मुंबई : सुशातसिंह आत्महत्या प्रकरणानंतर उघडकीस आलेल्या अमली पदार्थप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी जामीन मंजूर करताना रियाचा अमलीपदार्थ विक्रेत्यांच्या साखळीत सहभाग नसून तिने कथित अमलीपदार्थांचा व्यवसाय केल्याचे आढळत नाही, असे स्पष्ट मत नोंदवित न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला. दरम्यान, एनसीबीने मांडलेला युक्तीवाद न्यायालयाने फेटाळून लावला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यु प्रकरणातील अमलीपदार्थांचा प्रकरणात एनसीबीने रिया, तिचा भाऊ शौविकसह सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बसित परिहार आणि दिपेश सावंत यांना अटक केली होती. त्याविरोधात जामीन मिळण्यासाठी पाचही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार न्या. सारंग कोतवाल यांनी पाच स्वतंत्र निकालपत्राद्वारे निर्णय जाहीर केला. 

रियाला जामीन देताना न्यायालयाने म्हटले की, एनसीबीने केलेल्या तपासातून रियाने सुशांतसाठी कथित अमलीपदार्थ विकत घेतले होते आणि ती त्यातून व्यवसाय करत होती किंवा आर्थिक लाभ मिळवित होती, असे स्पष्ट होत नाही. तसेच तिची गुन्हेगारी पाश्वभूमी नाही, त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. एनडीपीएस कलम 27 अ मधील तरतुदी तिला लागू होत नाही कारण ती कोणत्याही प्रकारे अमलीपदार्थांचा व्यावसायिक वापरात नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अमलीपदार्थ प्रकरणात सेलिब्रिटी असलेल्या व्यक्तींना अटक झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी, असा एनसीबीने आजच्या सुनावणीवेळी युक्तीवाद केला. कारण सेलिब्रिटी या समाजातील तरूणाईचा आदर्श असतात. त्यांच्या कोणत्याही कृतीतून समाजात संदेश जातो. त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यात सेलिब्रिटींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे एनसीबीने म्हटले. मात्र, या युक्तीवादाशी न्यायालयाने असहमती व्यक्त केली. सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य व्यक्ती, कायद्यापुढे सर्व समान असतात, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना विशिष्ट वागणूक दिली जात नाही आणि त्यांचा वेगळा विचारही होत नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत. प्रत्येक प्रकरणांंचा निकाल कायदेशीर निकषांवरच लागतो, आरोपींच्या प्रतिष्ठेनुसार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT