मुंबई

विनामास्क वावरणारे शोधण्यासाठी BMCला माजी सैनिकांची मदत; कोव्हिडचा जोर वाढल्याने पालिकेचा निर्णय

समीर सुर्वे

मुंबई : विना मास्क वावरणाऱ्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडा पैकी 10 टक्के रक्कम महापालिका क्‍लिन अप मार्शल आणि उपद्रव शोधक पथकातील कर्मचाऱ्यांना देणार आहे. त्याच बरोबर निवृत्त सैनिकांनाही या मोहिमेत सामवून घेण्यात येणार असून त्यांना मासिक मानधनही देण्यात येणार आहे.

अनलॉक 4 सुरु झाल्यापासून मुंबईत कोव्हिडची रुग्ण वाढू लागल्यावर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली आहे. गेल्या चार दिवसात  मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन लाखाहून दंड वसुल करण्यात आला होता. तर, फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान 24 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला होता. पुर्वी महा पालिका मास्क न वापरणाऱ्यांकडून 1 हजार रुपयां पर्यंतचा दंड वसूल करत होती. आता ही दंडाची रक्‍कम 200 रुपये करण्यात आली आहे.
महापालिकेने आता मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई पालिकेचे क्‍लिन अप मार्शल तसेच उपद्रव शोधक पथकाचे कर्मचारी करत आहेत. कारवाई अधिक वाढावी  मार्शल आणि पालिका कर्मचाऱ्यांना दंडातील 10 टक्के रक्कम देणार आहे.
कोव्हिडचा कहर कधी संपेल याची खात्री नसल्याने आता महा पालिका विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निवृत्त सैनिकांचीही मदत घेणार आहे.  त्यांच्या पदानुसार 8 तासाच्या कामाचे 40 ते 50 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

एका दिवसात लाखाची कारवाई
महापालिकेने 16 सप्टेंबरला मास्क न लावणाऱ्यांकडून 1 लाख 17 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात बोरीवली विभागातून 12 हजार 200 रुपयांचा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर रोजी 83 हजार, 14 सप्टेंबर रोजी 98 हजार 900 आणि 15 सप्टेंबर रोजी 91 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT