मुंबई

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त, तेजस एक्सप्रेसला यार्डात व्हावं लागणार लॉकडाऊन !

प्रशांत कांबळे

मुंबई, ता. 17 : लॉकडाऊननंतर सर्वप्रथम सुरू करण्यात आलेल्या खासगी तेजस एक्सप्रेसला घरघर लागली आहे. ऐन दिवाळीचा हंगाम असतानाही देशातील पहिल्या तेजस एक्सप्रेसच्या उपक्रमाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, अखेर बंद करण्याची वेळ आली आहे. लखनऊ ते दिल्ली मार्गावरील ट्रेन 23 तर मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरधावणारी तेजस एक्स्प्रेस 24 नोव्हेंबर नंतर पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय  इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसिटीसी) घेतला आहे.

रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा खासगी तेजस एक्सप्रेसचा उपक्रम सुरू केला. मात्र, या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांनी नाकारले आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा रुळावर आणण्यात आलेल्या तेजसला लखनऊ - दिल्ली फक्त 30 टक्के तर मुंबई - अहमदाबाद फक्त 25 टक्केच प्रवासी मिळत असल्याने, एका फेरीसाठी लागणार तब्बल 15 लाखांचा खर्च काढणे सुद्धा खासगी तेजस एक्सप्रेसला कठीण झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला मुंबई-अहमदाबाद मार्गावरील 15 टक्के फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी घेतल्यानंतर आता,  24 नोव्हेंबर पासून अनिश्चित काळासाठीच तेजस एक्सप्रेसला लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

IRCTC ने लखनऊ - दिल्ली 4 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू केली होती. त्याचप्रमाणे अहमदाबाद - मुंबई तेजस एक्स्प्रेस यावर्षी 19 जानेवारीला सुरू करण्यात आली. दरम्यान कोविड19 च्या महामारीमुळे तब्बल सात महिने बंद राहिल्यानंतर, अनलॉक कालावधीत तेजसला 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा रुळावर आणण्यात आली. दरम्यान लॉकडाऊन पूर्वी 50 ते 80 टक्के प्रवासी संख्या मिळत होती. मात्र, लॉकडाऊननंतर 25 ते 30 टक्केच प्रवासी मिळत असल्याने तेजस एक्सप्रेसला आता यार्ड मध्येच उभी राहण्याची वेळ आली आहे।

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त

तेजस एक्स्प्रेसच्या जाणे-येण्याच्या एका दिवसाच्या फेरीला सुमारे 15 लाख खर्च लागतो. ज्यामध्ये एकूण 758 प्रवाशांची बुकिंग करता येते. त्याशिवाय ट्रेनमधील विविध सेवेचाही लाभ घेता येते. मात्र, दरम्यानच्या काळात फक्त 50 ते 60 प्रवाशांचीच एका ट्रेनमध्ये बुकिंग होत असल्याने, उत्पन्नापेक्षाही खर्चच जास्त होत असल्याने खासगी तेजस एक्सप्रेसला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

expenses are more than income IRCTC has decided to stop tejas express service untill further notice

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT