Sharad Pawar_Devendra Fadnvis
Sharad Pawar_Devendra Fadnvis 
मुंबई

कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार - शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी सध्या राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची चौकशी आयोगापुढं चौकशी सुरु आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी या हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं सूचकपणे म्हटलं आहे. (Fadnavis govt was responsible for Koregaon Bhima riots says Sharad Pawar)

पवार म्हणाले, जे काही घडलं ते दुर्दैवी होत. अशी परिस्थिती नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती, पण त्यांनी यामध्ये कुचराई केली. हे वेळीच थांबवता आलं असतं पण थांबवलं गेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस जबाबदार असतात.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची होती, त्यांनी योग्यवेळी काळजी घ्यायला हवी होती. पण त्यांनी योग्य वेळी कारवाई न करता त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळं ही दंगल झाल्याचा दावा पवारांनी चौकशी आयोगासमोर केला.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार झाला त्यावेळी २०१८ मध्ये राज्यात फडणवीस सरकार सत्तेत होतं. तसेच यावेळी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडेच होती. त्यामुळं पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार असल्यानं सूचकपणे फडणवीसच यासाठी जबाबदार असल्याचं शरद पवारांनी चौकशी आयोगापुढे सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT