liquor 
मुंबई

तळीरामांनो सावधान! भामट्यांकडून अशा प्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक

सकाळवृत्तसेवा

ठाणे : संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेतील आस्थापनां व्यतिरिक्त इतर आस्थापने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मद्याची दुकाने बंद असल्याचा गैरफायदा घेत काही भामट्यांनी समाजमाध्यमांवर मद्य विक्रीच्या नावाखाली खोट्या जाहिराती करून नागरिकांची फसवणूक सुरु केली आहे.

मद्य मागवण्यासाठी 50 टक्के रक्कम आगाऊ अदा करा आणि 20 मिनीटात घरपोच मद्य पुरवठा अशा पद्धतीने या जाहिराती करण्यात येत आहे. मात्र,  पैसे अदा केल्यानंतर कोणताही मद्य पुरवठा केला जात नसून नागरिकांची फसवणूक होत आहे. याबाबत ठाणे राज्य उत्पादन विभागाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती विभागाच्यावतीने देण्यात आली.

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मद्यपींचा मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याचा फायदा घेऊन काही भामट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ऑनलाईन मद्य विक्रीचा आधार घेतला आहे. समाजमाध्यमांवर मद्याविक्रीच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करण्यात येत आहे. जाहिराती खऱ्या वाटाव्यात यासाठी ठाण्यात विविध भागांमध्ये असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांची छायाचित्रे जाहितींमध्ये वापरण्यात येत आहे. घरपोच मद्य पोचवतो असे सांगत 50 टक्के रक्कम आधी घेऊन नंतर कोणताही मद्या पुरवठा केला जात नाही. अशाप्रकारची काही तक्रारी ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून संचार बंदीच्या काळात कोणत्याही प्रकरची मद्य विक्री सुरु नाही. समाजमाध्यमांवर करण्यात येणाऱ्या सर्व जाहिराती बनावट आहेत. हे सर्व फसवणूकीचे प्रकार असून नागरिकांनी या जाहिरातींच्या अमिषाला बळी पडू नका. 
- नितिन घुले,  अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  ठाणे.

False advertisements for the sale of alcohol

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT