मुंबई

गेलं बाबा एकदाचं ! अखेर फवारणी झाली आणि बोरिवलीकरांचा टांगणीला लागलेला जीव पडला भांड्यात...

कृष्ण जोशी

मुंबई : साऱ्या मुंबईच्या शिधावाटप दुकानांमध्ये धान्य पुरविणाऱ्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या बोरीवली येथील गोदामातून उडणाऱ्या टोके-पोरकिड्यांनी परिसरातील रहिवाशांना हैराण केले होते. अखेर भाजप आमदार सुनील राणे यांनी कॉर्पोरेशनच्या मागे लागून तेथे औषधफवारणी करून घेतली आणि रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

बोरीवलीच्या पश्चिमेला कॉर्पोरेशनच्या शंभर एकर जागेत हे अवाढव्य गोदाम आहे. तेथे शेकडो टन धान्य साठवलेले असते, त्यातील टोके-पोरकिडे तेथून उडून शेजारच्या झाडाझुडपांवर बसतात व तेथून ते उडत परिसरातील घरांमध्ये जातात. शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या या किड्यांचा रहिवाशांना एवढा त्रास झाला की त्यांनी आमदार राणे यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे राणे यांनी तेथे दोनदा जाऊन पहाणी केली व अधिकाऱ्यांच्या मागे लागून या शंभर एकर जागेतील झाडेझुडपे स्वच्छ करून घेतली. त्या जागेवर तसेच शेजारच्या नाल्यात हायड्रोजन पेरॉक्साईड हे औषध फवारले. त्यामुळे आता तेथील समर्पण रॉयल, संकेत या इमारतींमधील रहिवाशांचा हा किड्यांचा त्रास संपुष्टात आला. 

यानिमित्ताने राणे यांनी येथील अन्य प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्याचे प्रस्ताव दिले. या गोदामात रोज अडीचशे ट्रक धान्य घेऊन येतात, त्यानंतर ते कोराकेंद्राजवळील उड्डाणपुलावर उभे राहतात. त्यामुळे परिसराच्या अडचणींमध्ये भर पडते. या गोदामाजवळील रस्ता अरुंद असून तेथील इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरु असल्याने हे ट्रक आले की तेथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एकतर कॉर्पोरेशनने या ट्रकसाठी गोदामाशेजारच्या शंभर एकर जमिनीत वाहनतळ तयार करावा. त्याचप्रमाणे तेथून हायवेपर्यंत जाणारा पंचवीस फूट रुंद डीपी रोड तयार करावा, असे प्रस्तावही राणे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला दिले. 

येथून नवीन रस्ता तयार केला की जुन्या रस्त्यावरील वाहतूक निम्मी कमी होऊन सर्वांचाच त्रास कमी होईल, अशी कल्पना आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र तो अद्याप प्रलंबित असल्याने त्याबाबत त्वरेने निर्णय घ्यावा, अशी विनंतीही राणे यांनी कॉर्पोरेशनला केली आहे.

( संकलन - सुमित बागुल )

FCI finally sprays anti locust spray in borivali and affected areas of mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT