वाफेची मशीन.j
वाफेची मशीन.j 
मुंबई

कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा 

अमित गवळे


पाली, ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्याला संसर्ग होवू नये म्हणून नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आपली काळजी घेत आहेत. आयुर्वेदिक काढ घेतल्याने कोरोना होत नाही, अशी नागरिकांची समजून आहे. मात्र आता वाफ घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा सोशल माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे पालीमध्ये वाफ घेण्याच्या मशीनला अचानक मागणी मोठी मागणी वाढली आहे. 

सध्या बाजारात व विविध मेडिकल स्टोअर्समध्ये विविध कंपन्या, ब्रॅंड व किंमतीच्या वाफेच्या मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाफ घेण्याचा सल्ला काही डॉक्‍टर मंडळी देत असली तरी ती प्रमाणात व खबरदारी घेऊन घेण्याच्या सूचना देखील देत आहेत. पालीतील धनंजय गद्रे गुरुजींनी कुकरद्वारे घरच्या घरीच सोप्या पद्धतीने वाफ कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले आहे. त्यांनी सांगितले, की वाफ घेण्याचे अनेक फायदे आहेत. सर्दी पडसे आदी संसर्ग रोखण्यासाठी काही लोक विक्‍स किंवा इतर आयुर्वेदिक घटक टाकून वाफ घेतात. त्याच प्रमाणे वाफेने सांधेदुखीवर देखील आराम मिळू शकतो. यातून कोणताही रोग बरा होतो याचा दावा मात्र गद्रे गुरुजींनी केलेला नाही. तर समाधान भगत यांनी सांगितले की वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतो त्यामुळे रोज रात्री घरी वाफ घेतो. 


वाफेमुळे कोरोनाचा विषाणू मरतो किंवा संसर्ग कमी होतो याला कोणताही शास्त्रीय आधार किंवा पुरावा नाही. मात्र सोशीलमीडियाच्या माध्यमातून याचा प्रचार होतांना दिसत आहे. एवढेच काय कोणाला घासादुखी, सर्दी, पेंडसे, ताप आला तर अनेकजण एकमेकांना वाफ घेण्याचा सल्ला देखील देत आहेत. यामुळे वाफेचे मशीन बनविणाऱ्यांचा व विक्री करणाऱ्यांचा मात्र चांगला फायदा होताना दिसत आहे. 


काढा किंवा वाफ हे लक्षणे नसताना सतत किंवा गरज नसताना घेणे योग्य नाही. अधिक वेळ व सारखी वाफ घेतल्याने नाक व अंतर्गत भाग, श्वसन व अन्ननलिका यांना गंभीर इजा पोहचण्याची शक्‍यता आहे. वाफ घेण्यासाठी मशिनचीच आवश्‍यकता आहे असे देखील नाही. 
  डॉ. उमेश दोशी, माणगाव 


कोरोना आणि संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक लोक वाफ घेत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाफेच्या मशिनला खूप मागणी वाढली आहे. 
   परेश चौधरी, फार्मासिस्ट, न्यू शतायु मेडिकल, पाली 


संपुर्ण समाज मनच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झाले आहे. केवळ गरम पाणी पिऊन उपयोग नाही, तर नाकाच्या पोकळीत जाऊन राहणारे कोरोना व तत्स्यम विषाणू वाफ घेतल्यामुळे मरू किंवा क्षीण होऊ शकतात. त्यामुळे सध्या वाफेच्या मशिनला मागणी अधिक आहे. 
 निलेश लिलाचंद शेट, औषध विक्रेता. दि निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स. माणगाव-रायगड. 

Fear of the corona increased the demand for steam machines

( संपादन ः  रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT