पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये होते. त्यांच्या या दौऱ्याच्या फक्त एकच दिवस आधी सुरक्षा यंत्रणांना मुंबईतल्या पेडर रोड परिसरात एक ड्रोन आढळून आला. त्यानंतर आता या घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drone Spotted on Peddar road before PM Modi's Mumbai Visit)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी पेडर रोडमार्गे बीकेसीला जाणार होते. त्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी हा सगळा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव तपासला गेला. यावेळी एका स्थानिकाने माहिती दिली की, त्याला पेडर रोडवर एक ड्रोन (Drone Camera) दिसला. यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना आढळून आलं की, या परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी प्लॉट मॅपिंग आणि जाहिरातीसाठी बिल्डर ड्रोनचा वापर करत होता.
मात्र, नियमानुसार ड्रोन उडवण्याआधी पोलिसांना माहिती देणं आवश्यक असतं, त्यानंतर एक पोलीस घटनास्थळी देखरेखीसाठी उपस्थित राहतो. मात्र, या बिल्डरने पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नसल्याने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.