fire
fire 
मुंबई

भयंकर! उल्हासनगरात लग्नपत्रिका छपाईच्या इमारतीला धगधगती आग; तीन मजले जळून खाक

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगरातील प्रेस बाजारात असलेल्या लग्नपत्रिका-वेडिंगकार्ड छपाईच्या इमारतीला रविवारी रात्री उशिराने भीषण आग लागली. या भीषण आगीत तळमजला, दुसरा व तिसरा मजला जळून खाक झाला आहे. अग्निशमन व टँकर्स अशा 70 ते 80 गाड्यांनी तब्बल 12 तास पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र दुपार उलटून गेल्यावरही इमारती मधून धूर निघत होता.

रोशन कार्ड ही लग्नपत्रिका-वेडिंगकार्ड छपाईची तीन मजल्याची इमारत छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील प्रेस बाजारामध्ये आहे. त्याचे मालक रमेश उतमामी आहेत. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इमारतीत भीषण आग लागली. पालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांसोबत घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप एवढे महाभयंकर होते की सुमारे 70 ते 80 पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

मार्च ते मे मध्ये लग्नसराईचे दिवस असल्याने नागरिकांनी रोशन कार्ड या दुकानात लग्नपत्रिकांची ऑर्डर दिली होती. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने पत्रिका तीन मजल्यात विभागून ठेवण्यात आल्या होत्या. रात्री लागलेल्या आगीत त्या सर्व राख झाल्या. याबाबत पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याशी विचारणा केली असता ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच आमदार कुमार आयलानी, टीओके प्रमुख ओमी कालानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, प्रेस बाजारचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, समाजसेवक राजू तेलकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

(संपादन : वैभव गाटे)

fire broke out at a wedding card printing building in Ulhasnagar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT