e learning
e learning 
मुंबई

गोंधळात गोंधळ! शाळेचा पहिलाच दिवस अन् शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

सकाळवृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊन काळातील आजचा शाळेचा पहिल्या दिवशी काही ठिकाणी सहावीपासून पुढील वर्ग सुरु करण्यात आले. तर काही ठिकाणी केवळ दहावीचे ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी घरातूनच व्हर्च्युअल क्लासमध्ये हजेरी लावली असली तरी इंटरनेट सुविधेत काही बाधा आल्याने, तसेच त्याविषयी जास्त माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचा, पालकांचा पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याचे दिसून आले. 

15 जूनला शाळा सुरु करायची की नाही, ऑनलाईन वर्ग तरी भरवायचे की नाहीत याविषयी अद्यापपर्यंत शाळाव्यवस्थापन, शिक्षक, पालक यांच्यात गोंधळ असल्याचे दिसून आले. शिक्षण विभागाने 15 जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरु करुन शैक्षणिक वर्षास सुरुवात करण्याचे आदेश दिल्याने अनेक शाळांनी त्यापद्धतीने योजना आखली होती. रविवारी पुन्हा शिक्षण विभागाने केवळ नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जातील अशी घोषणा केली. शिक्षण विभागाकडे कोणतेही नियोजन नसून शालेय व्यवस्थापनाचाही त्यांनी गोंधळ उडविला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

सोमवारी काही शाळांतून ऑनलाईन वर्ग सुरु झाले तर  काही शाळा मात्र बंदच होत्या. ऑनलाईन वर्ग सुरु झाले असले तरी त्यातही काही शाळांत सहावी पासून पुढील सर्व वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तर काही शाळांत केवळ दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासास सुरुवात केली आहे. काही शाळांनी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर गृहपाठ दररोज पाठविण्यात येईल अशी तरतूद केली आहे. तर पालिका शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच खासगी शाळांतील प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान ऑनलाईन वर्ग सुरु होणार असल्याने विद्यार्थी तयार होऊन मोबाईल, लॅपटॉप समोर बसले खरे परंतू एकमेकांना कनेक्ट होताना, सगळे कनेक्ट झाले की नाही हे पाहताना शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली. त्यातही काही विद्यार्थी मध्येच चुकून लॉगआऊट होत होते, काहींना ही प्रणाली हाताळता येत नसल्यानेही गोंधळ उडत होता. 

ठोस उपाय योजना हव्यात
सोमवारी शाळा सुरु होणार तरीही रविवारपर्यंत शासनाचा कोणताही ठोस असा निर्णय होत नव्हता. या सर्व गोंधळामुळे शाळांनाही नक्की कसे नियोजन करावे याविषयी संभ्रम पडला होता. खासगी शाळांनी आपआपल्या परिने तयारी करुन ठेवली असल्याने बहुसंख्य शाळांनी दहावीचे ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नसून काही ठोस उपाययोजना शासनाने केल्या पाहीजेत. केवळ शाळांवर जबाबदारी न झटकता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योग्य याचा विचार झाला पाहिजे असे मत शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केले.

आम्ही 6 वी ते 10 वी आणि 12 वी चे ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. शिक्षक घरुनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत आहेत. विद्यार्थ्यांचे वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार प्रत्येकाचा अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. 
- लीना ओक-मॅथ्यु,  टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, टिळकनगर शाळा

सध्या आमच्या शाळेत सहावीपासूनच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु केले आहेत. शिक्षक घरुनच या विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे शिक्षण देत आहेत. यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काही शाळांनी केवळ दहावीचे वर्ग सुरु केले असल्याचे समजले. इतर शाळांशी आमची सातत्याने चर्चा सुरु असून जुलै मध्ये यावर नक्कीच तोडगा निघेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. 
- दिपिका जोशी, शिक्षिका.

first day of 10 th standard student and problem of internet in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT